महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला देशभरातील नेते उपस्थित राहणार; वाचा पाहुण्यांची यादी.. - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला देशभरातील नेते उपस्थित राहणार; वाचा पाहुण्यांची यादी..

03 डिसेंबर 2024 
MEDIA VNI 
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला देशभरातील नेते उपस्थित राहणार; वाचा पाहुण्यांची यादी..
मीडिया वी.एन.आय : 
मुबंई : महायुतीचा शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. शपथविधी सोहळ्याला भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहे. शपथविधीसाठी भाजपकडून महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे.
देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. भाजप शासित राज्यांसह मित्र पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, हरियाणा अशा महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे.

मुंबईतील आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्यासाठीचा भव्य दिव्य मंच आणि जय्यत तयारी करण्यात आली आहे. आझाद मैदानावरती 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी साधारणतः 30 ते 40 हजार लोक अपेक्षित आहेत. त्या अनुषंगाने आझाद मैदानात एकूण 3 स्टेज असणार आहे.
भाजपचे 10 मंत्री घेणार शपथ 


मुख्यमंत्र्यांसोबत दोन उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच भाजप महायुतीच मंत्रीमंडळही शपथ घेणार आहे. भाजपकडून मुख्यमंत्र्यांसोबत 10 मंत्री घेणार शपथ घेणारआहे. तर शिवसेना - राष्ट्रवादी उपमुख्यमंत्र्यांसोबत प्रत्येकी 5 मंत्री घेणार शपथ आहेत.

कोण कोणत्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे?

योगी आदित्यनाथ - मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

चंद्राबाबू नायडू - मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश

नितीश कुमार - मुख्यमंत्री, बिहार

प्रेमा खांडू - मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश

हिमंत बिश्व शर्मा - मुख्यमंत्री, आसाम

विष्णूदेव साय - मुख्यमंत्री, छत्तीसगढ

प्रमोद सावंत - मुख्यमंत्री, गोवा

भूपेंद्र पटेल - मुख्यमंत्री, गुजरात

नायब सिंग सैनी - मुख्यमंत्री, हरियाणा

मोहन यादव - मुख्यमंत्री, मध्य प्रदेश

कॉनराड संगमा - मुख्यमंत्री, मेघालय

भजनलाल शर्मा - मुख्यमंत्री, राजस्थान

मानिक साहा - मुख्यमंत्री, त्रिपुरा

पुष्कर सिंग धामी - मुख्यमंत्री, उत्तराखंड


शपथविधीसाठी कोणते संत उपस्थित राहणार?

नामदेव शास्त्री, भगवानगड

राधानाथ स्वामी महाराज, इस्कॉन

गौरांगदास महाराज, इस्कॉन

जनार्दन हरीजी महाराज

प्रसाद महाराज अंमळनेरकर

महानुभाव संप्रदायाचे विध्वंस बाबा आणि मोहन महाराज

जैन मुनी लोकेश

Leaders from across the country will attend the swearing-in ceremony of the Grand Alliance; Read the guest list..

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->