मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : कुरखेडा : मागील काही वर्षांत बि-बियाने, रासायनिक खते, औषधी तसेच मजूरीचे दर वाढल्याने धानाचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. मात्र त्या तुलनेत धानाची भाववाढ झालेली नाही.
त्यामुळे धान शेती परवडत नसून शेतकर्यांना शासकीय मदतीवर अवलंबून राहावे लागते. धानाला उत्पादन खर्चाच्या अनुरूप योग्य भाव मिळाल्यास शेतकरी स्वत: सक्षम बनत परावलंबी राहणार नाही, असे प्रतिपादन आमदार रामदास मसराम यानी केले.
खेडेगांव येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार मसराम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देसाईगंज पंचायत समितीचे माजी सभापती परसराम टिकले, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे, तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, आविका संस्थेचे सभापती राजीराम पुराम उपसभापती देविदास बंसोड, संचालक लोकचंद दरवडे, शंकर पाटनकर, शिवचरण मडावी, नामदेव दर्रो, टून्नू दर्रो, केवळराम जमदाळ, अंताराम कुमोटी, शशीकला जमदाळ, तुळजाबाई गोटा संस्थेचे व्यवस्थापक देवराव खंडारकर, उपसरपंच भूमेश्वर सोनवाने पोलिस पाटील परसराम नाट यासह शेतकरी बांधव हजर होते.
पूढे बोलताना आमदार मसराम यांनी सांगीतले की, शासकीय धान खरेदी केंद्र सुरू होण्यास दरवर्षी विलंब होत असल्याने गरजू शेतकरी खाजगी व्यापार्यांना धान विकतो. येथे हमीभावापेक्षा दर कमी राहत असल्याने त्यांचे नुकसान होते. त्यामुळे यापुढे वेळेवर शासकीय धान खरेदी केंद्र सुरू व्हावे म्हणून शासनाकडे योग्य तो पाठपूरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. संचालन व आभार ग्यानचंद सहारे यानी केले.
MLA Ramdas Masram
Need to get proper price of paddy commensurate with production cost: MLA Ramdas Masram