- खासदार डॉ. नामदेव किरसान यांची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कडे मागणी.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केंद्रीय अर्थमंत्री ना. निर्मला सितारामन यांची दिल्ली येथे संसद भवनाच्या कार्यालयात भेट घेतली.
गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र अतिदुर्गम व मागास क्षेत्र असल्याने लोकसभा क्षेत्रातील बहुतांश भागात अद्याप पायाभूत सुविधाचा विकास झालेला नाही, बऱ्याच गावात रस्ते, वीज, आरोग्य केंद्र नाही, त्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमावावा लागते. लोकसभा क्षेत्रात रोजगाराचे कोणतेही मोठे साधन नसल्याने लोकसभा क्षेत्रात बेरोजगारीचेही प्रमाण वाढत आहे, अश्या परिस्थिती गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीन विकासासाठी व लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या समस्याच्या निराकरणा करीता केंद्र शासनाच्या वतीने किमान 10 हजार कोटी रुपयाच्या आर्थिक पॅकेज ची मदत करावी अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी या भेटी दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कडे केली.
Give a special financial package for the development of Gadchiroli-Chimur Lok Sabha Constituency: Mr. Dr. Namdev Kirsan
- MP Dr. Namdev Kirsan's request to Finance Minister Nirmala Sitharaman!