दि. 07 डिसेंबर 2024
'माडे आमगांव' येथे महापरिनिर्वाण दिन साजरा.!मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : महामानव, परमपूज्य, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी चामोर्शी तालुक्यातील 'माडे आमगांव' येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा बौध्द समाज बांधव व गावकरी यांच्या उपस्थितीत. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच सामूहिक बुद्ध वंदना, पंचशील आणि समाज प्रबोधन मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आली. सायंकाळी बौद्ध समाज बांधवांसोबत समस्त गावकरी मिळून कॅन्डल रॅली काढून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. भारतात 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. महापरिनिर्वाण म्हणजे बौद्ध धर्मातील आत्म्याची मुक्ती. आणि आंबेडकरांच्या महान आत्म्याला शांती आणि त्यांच्या अमूल्य सेवेचा सन्मान करण्यासाठी हा दिवस देशभरात साजरा केला जातो.
Gadchiroli : Chamorshi : Celebrating Mahaparinirvana Day at 'Made Amgaon'!
#Gadchiroli