'हे' आहेत महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, गृह, अर्थ, ऊर्जा अन् बांधकाम खाते कोणत्या पक्षाला.? बघा यादी.. - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

'हे' आहेत महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, गृह, अर्थ, ऊर्जा अन् बांधकाम खाते कोणत्या पक्षाला.? बघा यादी..

दि. 18 डिसेंबर 2024 
MEDIA VNI 
'हे' आहेत महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, गृह, अर्थ, ऊर्जा अन् बांधकाम खाते कोणत्या पक्षाला.? बघा यादी..
Maharashtra Cabinet List 2024 : 
मीडिया वी.एन.आय : 
मुबंई : महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या, महायुतीला बहुमत प्राप्त झालं आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांपासून मंत्रिमंडळ ठरवण्यापर्यंत सर्व बाबी पार पडल्या, पण कोणते खाते कोणत्या पक्षाला याची मात्र चर्चाच होती, आता माहिती समोर आली असून कोणते खाते कोणत्या पक्षाकडे जाणार हे पुढे आले आहे.
सध्या महाराष्ट्रात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 15 डिसेंबरला झाला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्र्‍यांनी तर 6 राज्यमंत्र्‍यांनी शपथ घेतली. तुलनेत महिला मंत्र्‍यांची संख्या फारच कमी आहे.

सध्या तिन्ही घटक पक्ष आपापल्या मंत्र्‍यांना कोणते खाते द्यायचे याचा निर्णय घेत आहेत. मंत्र्यांना खातेवाटप अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. परंतु सूत्रांकडून सांगण्यात आले की, खातेवाटप ठरले असून कोणत खाते कोणत्या पक्षाला द्यायचे हे अंतर्गत पातळीवर ठरले आहे. तर काहीजण अपेक्षित खाते मिळावे म्हणून लाॅबिंग करत आहेत.

एक ते दोन दिवसांत खातेवाटपसंबंधी निर्णय होणार आहे. शिवसेनेची यादी काल रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची यादी आज दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांत राज्यपालांना देणार संपूर्ण खाते वाटपाची यादी देणार आहे.

कसे असेल खातेवाटप?

गृहखाते भाजपकडे राहणार.
नगरविकास खाते शिवसेनेकडे राहणार आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थ खाते मिळणार आहे.
महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा भाजपकडेच राहणार आहे.
शिवसेनेचे उत्पादन शुल्क खाते राष्ट्रवादीला जाणार
भाजपकडे असलेले गृहनिर्माण खाते आता शिवसेनेला दिले जाणार आहे.
महिला व बालविकास खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार आहे.
हेही वाचा : मोठी बातमी..! मंत्रीमंडळातील एक रिक्त जागा जयंत पाटलांसाठी..? वाचा राजकारणात काय घडतंय

भाजपच्या वाट्याला ही खाती

गृहमंत्रालय
महसूल
सार्वजनिक बांधकाम
पर्यटन
ऊर्जा
शिवसेनेच्या वाट्याला ही खाती

नगरविकास
गृहनिर्माण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ही खाती

अर्थ
महिला आणि बालविकास
उत्पादन शुल्क

हे आहेत महाराष्ट्र मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री 

1.चंद्रशेखर बावनकुळे

2. राधाकृष्ण विखेपाटील

3. ⁠हसन मुश्रीफ

4. ⁠चंद्रकांत पाटील

5. ⁠गिरीश महाजन

6. ⁠गुलाबराव पाटील

7. ⁠गणेश नाईक

8. ⁠दादा भुसे

9. ⁠संजय राठोड

10. ⁠धनंजय मुंडे

11. ⁠मंगलप्रभात लोढा

12. ⁠उदय सामंत

13. ⁠जयकुमार रावळ

14. ⁠पंकजा मुंडे

15. ⁠अतुल सावे

16. ⁠अशोक उईके

17. ⁠शंभूराज देसाई

18. ⁠आशिष शेलार

19. ⁠दत्ता भरणे

20. ⁠आदिती तटकरे

21. ⁠शिवेंद्रसिंह भोसले

22. ⁠माणिकराव कोकाटे

23. ⁠जयकुमार गोरे

24. ⁠नरहरी झिरवळ

25. ⁠संजय सावकारे

26. ⁠संजय शिरसाठ

27. ⁠प्रताप सरनाईक

28. ⁠भरत गोगावले

29. ⁠मकरंद पाटील

30. ⁠नितेश राणे

31. ⁠आकाश फुंडकर

32. ⁠बाबासाहेब पाटील

33. ⁠प्रकाश आबिटकर

महाराष्ट्र मंत्रिमंडळातील राज्यमंत्री

1. माधुरी मिसाळ

2. ⁠आशिष जयस्वाल

3. ⁠पंकज भोयर

4. ⁠मेघना बोर्डीकर साकोरे

5. ⁠इंद्रनील नाईक

6. ⁠योगेश कदम

This' is Maharashtra's cabinet, home, finance, energy and construction account to which party.? See the list..

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->