परभणी येथील प्रकरणात कठोर कारवाई करा : गडचिरोली येथील राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांची मागणी.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

परभणी येथील प्रकरणात कठोर कारवाई करा : गडचिरोली येथील राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांची मागणी.!

दि. 17 डिसेंबर 2024
MEDIA VNI 
परभणी येथील प्रकरणात कठोर कारवाई करा.!
- गडचिरोली येथील राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांची मागणी.!
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : परभणी येथे दिनांक 10 डिसेंबर रोजी भारतीय संवीधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तसेच आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंषी या तरुणाच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गडचिरोली येथील विविध राजकीय पक्ष, सामाजिक, धार्मिक संघटनांनी केली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या नावाने लिहिलेले निवेदन आज 16 डिसेंबर रोजी दुपारी या संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संजय दैने यांना सादर केले व याबाबत सविस्तर चर्चा केली.
यासोबतच गडचिरोली तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन आदीवासी मुलीवर झालेल्या लैंगीक अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयाव्दारे आरोपीला कडक शिक्षा देउन सदर मुलीला अर्थसहाय्य देण्यात यावे, अशीही मागणी या शिष्टमंडळाने केली.
परभणी येथे दि. 10 डिसेंबर 2024 रोजी भारतीय संवीधानाच्या प्रतीकृतीची समाजकंटक माथेफिरुने विंटबना केली आहे. या देशद्रोही कृत्याचा तीव्र निषेध करीत हे कृत्य करणाऱ्या देशद्रोही समाजकंटकावर देशद्रोह कायद्यानुसार कडक कार्यवाही करण्यात यावी. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करुन यातील मास्टर माईडंचा शोध घेण्यात यावा व त्याचेवर सुध्दा कारवाई करण्यात यावी. परभणी प्रकरणात आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयील कोठडीत असतांना मृत्यू झालेला आहे. या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच आंदोलन करणाऱ्या नागरीकांवर दाखल केलेल्या केसेस त्वरीत मागे घेण्यात याव्या व आंदोलकांची सुटका करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
गडचिरोली तालुक्यातील एका अल्पवयीन आदीवासी मुलीवर एका नराधमाने लैंगीक अत्याचार केला. या प्रकरणाचा त्वरीत निकाल लागण्याच्यादृष्टीने जलदगती न्यायालयात केस चालविण्यात यावी व आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच सदर मुलीचे आई-वडील अतिशय गरीब असल्याने तिच्या पुढील शिक्षण व संगोपणासाठी शासनाच्या वतीने किमान 50 लक्ष रुपयाचे आर्थिकसहाय्य देण्यात याव, अशीही मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळात अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, बिआरएसपीचे जिल्हा प्रमुख मिलिंद बांबोळे, कम्युनिष्ट पार्टीचे रोहिदास फुलझेले, नारायणसिंग उईके समितीच्या कुसुम अलाम, संविधान फाउंडेशनचे गौतम मेश्राम, भारतीय बौध्द महासभेचे तुलाराम राऊत, आदिवासी एम्पालाईल फेडरेशनचे भरत येरमे, अंध्दश्रंध्दा निर्मुलन समितीचे विलास निंबोरकर, माळी समाज समितीचे हरिदास कोटरंगे, प्रा. गौतम डांगे, आदिवासी युवा परिषदेचे कुणाल कोवे नारीशक्तीच्या जयश्री येरमे, कॉंग्रेसचे तालुकाअध्यक्ष वसंत राऊत, जेष्ठ कार्यकर्ते, समशेर खान पठाण, रजनीकांत मोटघरे, नंदु वाईलकर रिपब्लिकन पक्षाचे ज्योती उंदीरवाडे , प्रदीप भैसारे, प्रल्हाद रायपुरे, अशोक खोब्रागडे, पुण्यवान सोरते, नरेंद्र रायपुरे, लहुजी रामटेकेे, अरविंद वाळके, रेखा तोडासे, मंजू आत्राम, विना उईके, कविता उराडे, शालीनी पेंदाम, सुनिता उसेंडी व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Take strict action in the case of Parbhani.!
- Demand of political parties, social organizations in Gadchiroli.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->