New Rule from 1st January 2025:
मीडिया वी. एन. आय :
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक बदल होत असतात. या वेळेला जानेवारीची पहिली तारीख नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. या दिवसापासून देशभरात अनेक नियम लागू होणार आहेत.
ज्यामुळे नागरिकांच्या दैंनदिन जीवनावर थेट परिणाम होणार आहे.
नवीन वर्षात काय-काय बद्ल होणार आहे. हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला नवीन वर्षात कोण-कोणते बदल होणार आहेत हे माहिती नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 1 जानेवारी 2025 पासून कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घेऊया...
एलपीजी सिलेंडरच्या किंमती : दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेऊन नवीन दर जाहीर करतात. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत होत आहे. दरम्यान घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (14.2 किलो) किंमती स्थिर आहेत. जानेवारीत महिन्यात आता काय बदल होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शिधापत्रिकेत बदल : सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन व्यवस्था लागू केली आहे. जेणेकरून लोकांना अधिक पारदर्शकतेने सुविधा मिळतील. हे नवीन नियम लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतील.
कारच्या किंमतीत वाढ: देशातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ 1 ते 3 टक्क्यांपर्यंत असू शकते.
मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन: जीएसटी पोर्टलच्या सुरक्षिततेसाठी MFA आता अनिवार्य आहे. त्यासाठी आता सर्वांनी प्रशिक्षित होणे आवश्यक आहे.
एफडी नियमांमध्ये बदल : आरबीआयने मुदत ठेव (FD) नियमांमध्ये बदल केले आहेत जे 1 जानेवारी 2025 पासून लागू होतील.
व्हॉट्सअॅप : 1 जानेवारी 2025 पासून व्हॉट्सअॅप ऑपरेटिंग सिस्टमच्या जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या अनेक अँड्रॉइड फोनला सपोर्ट करणार नाही. यामध्ये सॅमसंग, एलजी, सोनी, एचटीसी आणि मोटोरोला यांसारख्या लोकप्रिय ब्रँडच्या मॉडेल्सचाही समावेश आहे.
ईपीएफओ पेन्शनधारकांसाठी बदलणार नियम : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) नवीन नियम लागू होणार. देशातील कोणत्याही बँकेतून आता ते त्यांची पेन्शनची रक्कम काढू शकतात.
नवीन यूएस व्हिसा अपॉइंटमेंट नियम : 1 जानेवारी 2025 पासून भारतातील यूएस दूतावास नॉन-इमिग्रंट व्हिसा अर्जदारांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अपॉइंटमेंट मिळतील. 17 जानेवारी 2025 पासून सुरू होणारे नवीन डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (DHS) नियम H-1B प्रक्रिया सुव्यवस्थित आणि सुलभ करण्याचे उद्दिष्ट आहे.
युपीआय 123 पे मर्यादा वाढवली : भारतीय रिझर्व्ह बँकेने युपीआय 123 पे मर्यादा वाढवली आहे. 1 जानेवारी 2025 ही मर्यादा पासून लागू केली जाईल. ही मर्यादा 5,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आली आहे. आता या माध्यमातून मोठे व्यवहार सोपे होणार आहेत.
हमीशिवाय कर्ज देणे सोपे : आता शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या हमीशिवाय कर्ज योजनेत मर्यादा वाढविण्यात आली आहे. ही मर्यादा 1.6 लाख रुपयांवरून 2 लाख रुपये करण्यात आली आहे.
These rules will change from LPG to FD' from January 1, know the complete list.!
New Rule from 1st January 2025:
#india #maharashtra #marathinews #MediaVNI