गडचिरोली प्रेस क्लब तर्फे जिल्हा गौरव पुरस्काराने आमटे दाम्पत्यांना सन्मानित.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गडचिरोली प्रेस क्लब तर्फे जिल्हा गौरव पुरस्काराने आमटे दाम्पत्यांना सन्मानित.!

दि. 06 जानेवारी 2025 
MEDIA VNI 
गडचिरोली प्रेस क्लब तर्फे जिल्हा गौरव पुरस्काराने आमटे दाम्पत्यांना सन्मानित.! 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज दि.6 जानेवारी रोजी गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने जिल्हा गौरव पुरस्कार प्रदान सोहळा आणि गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गडचिरोली प्रेस क्लब तर्फे जिल्हा गौरव पुरस्कार देण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात समाजसेवेचा वारसा पुढे नेणारे हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत प्रकाश आमटे आणि समिक्षा अनिकेत आमटे या दाम्पत्याला यावर्षीचा जिल्हा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार उपस्थित होते. पुरस्कारांचे वितरण लोकसत्ता नागपूर आवृत्तीचे संपादक देवेंद्र गावंडे यांच्या हस्ते झाले. 
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॅा.प्रमोद मुनघाटे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून आ.डॅा.मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष अविनाश भांडेकर होते. 
सदर कार्यक्रमात वक्त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातील अडचणी आणि पत्रकार जीवनातील संघर्ष  याबद्दल बोलत असताना पत्रकार हा आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजामध्ये क्रांती घडवून आणण्याचे फार मोठं काम करत असते. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिताकडे बघितलं जाते. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी पत्रकारितेत सत्यता व जिवंतपणा असणे ही खूप गरजेचे व काळाची गरज आहे, पत्रकार जीवनातील संघर्ष अडचणी आणि त्यावरील उपाय या सर्व बाबींवर व बऱ्याच काही विषयावर वक्त्यांनी योग्यरित्या मार्गदर्शन केले. 
तसेच कार्यक्रमाच्या शेवटला गीत गायन स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन मिलिंद उमरे तर कार्यक्रमाची प्रास्ताविक अविनाश भांडेकर यांनी केले. तर आभार प्रेस क्लबचे सचिव रूपराज वाकोडे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी प्रेस क्लब गडचिरोलीचे उपाध्यक्ष रोहिदास राऊत, कोषाध्यक्ष शेमदेव चापले, सहसचिव सुरेश नगराळे, सदस्य सुरेश पद्मशाली, नंदकिशोर काथवटे, निलेश पटले, विलास दशमुखे, मनोज ताजने, सहयोगी सदस्य नंदकिशोर पोटे, इरफान पठान, आशीष अग्रवाल, मनिष कासर्लावार, मनिष रक्षमवार, रोमित तोम्बर्लावार, संदीप कांबळे, राजेश खोब्रागडे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
गडचिरोली प्रेस क्लब तर्फे कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांचे व गडचिरोलीकरांचे आभार मानण्यात आले. 
Gadchiroli Press Club honored Amte couple with district award.
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #MediaVNI 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->