दि. 03 जानेवारी 2025
रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे उद्घाटन कार्यक्रम संपन्न.! मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : रस्ता सुरक्षा अभियान 2025 दिनांक 01 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे. सदर अभियानाचा औपचारीक उद्घाटन कार्यक्रम दिनांक 02 जानेवारी 2025 रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली किरण मोरे, यांचे मार्गदर्शनाखाली तर सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, अशोक जाधव यांचे देखरेखीखाली घेण्यात आले.
सदर उद्घाटन कार्यक्रमाकरीता अध्यक्ष सुर्यकांत पिदूरकर, मुख्याधिकारी नगर परिषद, गडचिरोली हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विभाग नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे, पोलीस विभाग, वाहतुक शाखा, गडचिरोली शरद मेश्राम, ॲडीशनल सिव्हिल सर्जन, डॉ. मनिष मेश्राम, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, गडचिरोली रुपाली काळे, हे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेकरीता मोटार वाहन निरिक्षक श्रीमती दिघावकर, के.के. शिंदे, वाय.आर. मोडक, जी.आर. धुर्वे, तसेच सहा. मोटार वाहन निरीक्षक आय. आर. मदने, ओ.पी. मेश्राम, पी.डी. येवले, के.एस.पारखी, श्रीमती आर. व्ही कांबळे, जी.आर. सिंह यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक जाधव, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले. सुत्रसंचालन हर्षल बदखल यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती आर.व्ही. कांबळे यांनी केले.
Road Safety Mission 2025 Inaugural Program Concluded! #गडचिरोली #Gadchiroli #RTO