- भिक्षी माल येथील जयंती कार्यक्रम व सभागृहाचे भूमिपूजन.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली / चामोर्शी : जि. प. प्रा.शाळा भिक्षी माल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी पूर्णवेळ उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सभागृहाचे भूमिपूजनही करण्यात आले.
यावेळी सरपंच अंजुताई मोटघरे, जैराम चलाख, सुरेश शहा, संतोष नर्मलवार, वासेकर सर,सविताताई वाळके,अनिता ठाकूर, भारत ठाकूर तसेच ग्रामवासीय उपस्थित होते.