मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : भाजपा महिला मोर्चा, गडचिरोली शहर यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य महिला मुक्ती दिन विश्राम भवन इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे साजरी करण्यात आली व जुन्या कार्यकर्त्यां महिलांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी. नगराध्यक्षा न. प. गडचिरोली सौ. योगिताताई पिपरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रात (नायगाव - सातारा) येथे झाला. त्या कुटुंबातील सर्वात लहान सदस्य होत्या. त्यांना एकूण तीन भावंडे होती. त्या माळी समाजाच्या होत्या, त्यावेळच्या समाजव्यवस्थेप्रमाणे नऊ वर्षांच्या असताना त्यांचे लग्न झाले. सावित्रीबाईंना लिहिता-वाचता येत नव्हते. त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या घरी शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात असमानता, पितृसत्ता आणि सामाजिक दडपशाहीशी लढण्यासाठी काम केले.
सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी ब्रिटिश राजवटीत १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली भारतीय शाळा सुरू केली. शाळेत सुरुवातीला फक्त नऊ मुली होत्या. हळूहळू संख्या वाढून २५ झाल्या व सावित्रीबाई फुले च्या माध्यमातून मुलींचे अनेक शाळा सुरु झाल्या. त्यांच्या शाळेत शिकवल्या जाणार्या अभ्यासक्रमात वेद आणि शास्त्रासारख्या ग्रंथांऐवजी गणित, विज्ञान आणि सामाजिक अभ्यासांचा समावेश करण्यात आला व आज अनेक महिला शिकून डॉक्टर, वकील, पायलट, अधिकारी झाल्या असून अनेक महिला राजकारनात आहेत.
सावित्रीबाई फुले या मराठी कवयित्री, समाजसुधारक आणि शिक्षिका होत्या. त्यांनी व त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी महिला हक्क आणि शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. आजच्या जगातील मराठी महाकाव्याची अग्रदूत कवयित्री म्हणून ओळखल्या जातात.
यावेळी प्रामुख्याने माजी. आ. तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी, माजी. आ. डॉ. नामदेवरावजी उसेंडी, भाजपा लोकसभा समन्वयक तथा विधानसभा संयोजक, प्रमोद पिपरे, भाजपा जेष्ठ नेते, रमेश भुरसे, माजी. सभापती सौ. रंजनाताई कोडापे, भाजपा जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, मुनेश्वर बोरकर, जिल्हा सचिव सौ. वर्षाताई शेडमाके, तालुका अध्यक्ष विलासजी भांडेकर, महिला तालुका अध्यक्ष सौ. अर्चना बोरकुटे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, महिला शहर अध्यक्ष सौ. कविताताई उरकुडे,माजी नगरसेवक केशवजी निंबोळ, सौ.वैष्णवी नैताम,शहर महामंत्री विवेक बैस,सौ.पल्लवी बारापात्रे, सौ.अर्चना चन्नावार, सौ. अर्चना निंबोळ, सौ.रशमी बानमारे, देवाजी लाटकर, प्रा.अरुण उराडे, बेबीताई चिचघरे , पुनम हेमके, रुमन ताई ठाकरे,कोमल बारसागडे,नीताताई बैस, नेवारे ताई व सर्व भाजपा महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.