मीडिया वी.एन.आय :
चंद्रपूर : नागभीड ब्रम्हपुरी मार्गावर सायगाटा गावाजवळ भिषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स व हायवा ट्रकची समोरासमोर जबर धडकझाली यामध्ये ट्रॅव्हल्स मधील 14 प्रवासी जखमी झाले असून एक गंभीर जखमी आहे.
जखमींना ब्रम्हपुरी ग्रामीण रूगणालयामध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. हा भिषण अपघात आज गुरूवारी दुपारी साडेतीन वाजताचे सुमारास घडला.
(दि. 27 मार्च) गुरूवारी नागपूर येथून ब्रम्हपुरी येथे एम एच 29 ए टी 3036 क्रमांची ट्रॅव्हल्स दुपारी साडेतीन वाजताचे सुमारास येत होती. तर ब्रम्हपुरी कडून नागभीड कडे येत होता. दरम्यान नागभिड ब्रम्हपुरी मार्गावर सायगाटा गावाजवळ हायवा ट्रॅक व ट्रॅव्हल्सची समोरा समोर येऊन भिषण धडक झाली. धडक एवढी जबर होती कि ट्रॅव्हल्सचा समोरील भाग पूर्णत: चक्काचूर झाला. तर ट्रकचा काही भाग नादुरूस्त झाला आहे. अपघात होताच लगतचे प्रवासी नागरिक धावून आले. पोलिसांना माहिती देण्यात आली. काही वेळात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस व नागरिकांनी ट्रॅव्हल्स मधील जखमींना बाहेर काढून ब्रम्हपुरी येथे ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी पाठविले.
या अपघातामध्ये 14 प्रवासी जखमी झाले. त्यामध्ये एक गंभीर जखमी आहे. तर हायवा ट्रकचा चालक हा जखमी झाला आहे. दोन्ही वाहन चालकांचे स्टेअरिंग वरील नियंत्रण बिघडल्याने वाहने समोरा समोर येऊन धडकल्याचे सांगितले जात आहे.
Chandrapur: Travels - Highway truck collides head-on! Accident
#chandrapur #MediaVNI
A head-on collision between a speeding bus and a truck; 15 passengers injured!