MEDIA VNI
गडचिरोली : ट्रकचा भीषण अपघात, ३ जण जखमी तर दुचाकीस्वाराचा उपचारदरम्यान मृत्यु.! मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली/ चामोर्शी : चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील अनखोडा येथील वळणावर लोखंडी पत्रे वाहतूक करणारा ट्रक अनियंत्रित होवून उलटला. यात विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारासह चार जण जखमी झाल्याची घटना ३० मार्च २०२५ रविवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास घडली.
रमेश शेरकी (६०) रा. आष्टी, धीरज श्यामकुमार (२७) रा. भिलाई, मनोज महंतो (५०) रा. भिलाई, धनसिंग चौधरी (४५) रा. भिलाई छत्तीसगड अशी जखमींची नावे आहेत. भिलाईवरून गडचिरोली आष्टी मार्गे ट्रक क्रमांक CG 07 CR 4622 हा लोखंडी पत्रे घेवुन जात होता दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास अनखोडा येथील वळणावर ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक अनियंत्रित झाला व तो पलटी झाला.
याच वेळी विरूद्ध दिशेने येणाऱ्या स्कुटीवर ट्रक मधील लोखंडी पत्रे पडली यामुळे दुचाकीस्वार रमेश शेरकी (६०) रा. आष्टी,याना मार लागला तर ट्रकमधील तिघे जण जखमी झाले.
घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे पोलिस पथकासह घटना स्थळी दाखल झाले.जखमींना प्राथमिक उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले व पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. तर जख्मी पैकी रमेश शेरकी (६०) रा. आष्टी,यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झालेला आहे रस्त्यात ट्रक पलटी झाल्याने बराच वेळ आष्टी चामोर्शी मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. क्रेनच्या साहाय्याने अपघात ग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतुक सूरू करण्यात आली.
घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहे.
Gadchiroli: Serious truck accident, 3 injured and a biker dies during treatment!
#गडचिरोली #Gadchiroli #MediaVNI #Maharashtra