दि. 06 एप्रिल 2025
गडचिरोली येथे वैनगंगा नदीपात्रात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन.! -चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला पाणी टंचाई भेडसावत असल्याने केले आंदोलन.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम व मागास जिल्हा असून जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे.
प्रशासनाने गोसेखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्याने गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली असून शेतकऱ्यांना शेती करायला अडचण निर्माण झाली आहे.
नदी काठावरील गावातील भूजल पातळी सुद्धा कमी झाल्याने अनेक गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहे. मात्र सरकार आणि प्रशासन दोघांचे या समस्येकडे लक्ष नाही. .
सदर मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने वैनगंगा नदीपात्रात आंदोलन करून गोसीखुर्द धरणातील तातडीने पाणी सोडण्यात यावे ही मागणी केली आहे.
गोसेखुर्द च्या पाण्यासाठी वैनगंगा नदी पात्रात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन
एक आठवड्याच्या आत पाणी न सोडल्यास मुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा ईशारा
काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान,आमदार रामदास मसराम यांचीही उपस्थिती व मार्गदर्शन.
आंदोलनातील इतर मागण्या..
◆ गडचिरोली येते होणाऱ्या विमानतळाकरीता सुपीक जमिन अधिग्रहित न करता त्यासाठी इतर शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करण्यात यावा.
◆ भेंडाळा त.चामोर्शी परीसरातील MIDC करिता प्रस्तावित अतिरिक्त क्षेत्र स्थापना करण्याकरिता शासनाने अवलंबिलेले धोरण शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे असून शेतकर्यांशी चर्चा केल्याशिवाय जागा अधिग्रहीत करू नये.
◆ कोटगल बँरेज करिता अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेत जमिनीचा मोबदला संबधित शेतकर्यांना मिळाले नसून, योग्य तो मोबदला त्वरित देण्यात यावा व जे शेती बारमाही पाण्याखाली बुडीत क्षेत्रात येते अश्या शेतीस अतिरिक्त मोबदला देण्यात यावा.
◆ मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे थकीत असलेले मजुरीचे पैसे त्वरित देण्यात यावे.
◆ वडसा - गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमीनधारक सर्व शेतकऱ्यांना नवीन दरानुसार जमिनीचा मोबदला देण्यात यावा.
Congress's sit-in protest in the Wainganga riverbed in Gadchiroli.!
-The protest was held because Chandrapur and Gadchiroli districts are facing water shortage.!
#गडचिरोली #gadchiroli #Maharashtra #MediaVNI