दि. 12 एप्रिल 2025
“जयभीम पदयात्रा” आयोजनात सहभागासाठी आवाहन.! मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी साजरी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन गडचिरोलीच्यावतीने “जयभीम पदयात्रा” चे आयोजन दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले आहे.
ही पदयात्रा सकाळी 7.30 वा. जिल्हा क्रीडा संकुल, कॉम्प्लेक्स एरिया, गडचिरोली येथून सुरू होणार असून पुढील मार्ग असा आहे:
आय.टी.आय. चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – शासकीय विश्रामगृह – चंद्रपूर रोड, गडचिरोली.
पदयात्रेनंतर समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील तसेच शहरातील नागरिक, विद्यार्थी, युवक-युवती, खेळाडू, विविध युवक व क्रीडा मंडळांचे पदाधिकारी, तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
Gadchiroli : Call for participation in “Jaibhim Padayatra”!
#gadchiroli #Maharashtra #MediaVNI