दि. 12 एप्रिल 2025
आमदार मसराम यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर केली चर्चा.! मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : (दि. 11 एप्रिल रोजी) जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विविध महत्त्वाच्या स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या भेटीदरम्यान प्रामुख्याने पाच महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला.
नगरपरिषद देसाईगंज अंतर्गत कार्यरत सफाई कामगार व मजुरांना भेडसावत असलेल्या समस्या, वेतन वितरणातील अडचणी, तसेच त्यांच्या हक्कांसंदर्भात चर्चा करण्यात आली. संबंधित कंत्राटदाराला यंत्रणांनी याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना आवश्यक असणारी रेती ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात यावी तसेच प्रत्येकी ५ ब्रास वाढीव रेती देण्यात यावी, अशीही जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडण्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. नदीकाठच्या गावाजवळ शेतीसाठी तसेच पिण्यासाठी पाण्याची मोठी अडचण निर्माण झालेली आहे म्हणून नदीतील जलप्रवाह सुरळीत राहावा यासाठी नियोजनबद्ध जलसोड सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील सीएमआर राईस मिलिंग घोटाळ्याचा तपशीलवार आढावा घेऊन संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही जोरदार मागणी करण्यात आली.
शेवटी, वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या हल्ल्यांपासून शेतीचे व ग्रामस्थांचे संरक्षण करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, अशा मागण्याही जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडण्यात आल्या.
या बैठकीदरम्यान संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
त्या वेळी उपस्थीत जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गड महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे,माजी जिल्हा प. उपाध्यक्ष गड तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट, माजी जिल्हा प. सदस्य गड प्रभाकर तुलावी, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, माजी काँग्रेस क. तालुकाध्यक्ष कुरखेड .जयंत हरडे,भाग्यवान मेश्राम,कमलेश बारस्कर, सागर वाढई,गरीबदास बाटबरवे,स्वप्नील मिसार,गौरव शिलार,शैलेश येलगंदवार उपस्थित होते.
Gadchiroli: MLA Masram met Collector Gadchiroli and discussed various issues.