दि. 10 एप्रिल 2025
आमदार मसराम यांच्या हस्ते शिवाजी वार्ड येथील काली मंदिर परिसरात सौंदर्यकरणाची भूमिपूजन.! मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली/देसाईगंज : देसाईगंज शहरातील शिवाजी वार्ड येथील काली माता मंदिराजवळील परिसरात नागरिकांच्या सुविधेसाठी गट्टू बांधकाम करण्यात येणार आहे. हे काम आमदार रामदास मसराम यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झाले असून, त्यासाठी 5 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या भागातील नागरिकांनी पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी लक्षात घेता संबंधित बांधकामाची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आमदार मसराम यांनी तात्काळ लक्ष घालून निधी उपलब्ध करून दिला. लवकरच या कामाचा शुभारंभ होणार असून, स्थानिक नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
या माध्यमातून परिसरातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होणार असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुटसुटीतपणा निर्माण होणार आहे.
त्या वेळी उपस्थीत काली मंदिर महिला समितीचे अध्यक्ष रजनी आत्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विनोद मते, काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष कमलेश बारस्कर, सागर वाढई, गौरव शिलार, अमोल मिसार, शितल पेरगार,ज्योती तुमाने,देविका तुमाने,रेखा कवासे, गंगा कोडापे, वंदना नैताम, सिंधू कोडापे, शशिकला कुलशिंगे, तपश्या कुलशिंगे,शेवंता पंदरे,अल्का दहिकर, कुसुम कोहचडे, शशिकला कुलशिंगे, पिंकी कुलशिंगे, दीपाली कोसरे,वेणु तोडसे, कांती कोवे, मीराबाई आत्राम,सेजल कोवे, सुषमा गुरु,लता नान्हे, पल्लवी कुंभलवार,मनिषा गेडाम,शीतल दाट,दुर्गा आत्राम,नैना नान्हे,जया पेंदरे,गणेश गेडाम,राजू गुरु,सरोज कोवे,प्रदीप कुलशिंगे.आदि उपस्थित होते.
MLA Masram performs the foundation stone puja for beautification of the Kali Temple area in Shivaji Ward!
#Gadchiroli