मार्कंडा मंदिराच्या जिर्णोद्धाराला गती द्या;- सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

मार्कंडा मंदिराच्या जिर्णोद्धाराला गती द्या;- सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल.!

दि. 25 एप्रिल 2025
MEDIA VNI 
मार्कंडा मंदिराच्या जिर्णोद्धाराला गती द्या;- सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल.!
- नऊ कोटींच्या विकासकामांना लवकरच होणार सुरुवात.!
मीडिया वी.एन.आय
गडचिरोली :  राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज मार्कंडा देवस्थान येथे भेट देऊन मंदिराच्या जिर्णोद्धार व विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पुरातत्व विभागाला अधिक कामगार नियुक्त करून मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम गतीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यमंत्री जयस्वाल यांनी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिक व भाविकांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. मार्कंडा मंदिर हे प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे स्थान असून त्याच्या जिर्णोद्धाराचे काम सध्या पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मत भाविकांनी व्यक्त केले.
राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी यावेळी मंदिरालगतच्या परिसरात प्रस्तावित असलेल्या नऊ कोटी रुपयांच्या विकासकामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती दिली. 
यावेळी उपविभागीय अधिकारी रणजीत यादव, पुरातत्त्व विभागाचे शुभम कोरे एमएसआरडीसी चे श्री जाधव, तहसीलदार प्रशांत घोरुडे, गट विकास अधिकारी सागर पाटील तसेच महसूल व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Accelerate the restoration of Markanda Temple;- Co-Palace Minister Adv. Ashish Jaiswal.
- Development works worth nine crores will start soon.!
#MediaVNI #Maharashtra #gadchiroli 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->