जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू.!

दि. 23 एप्रिल 2025 
MEDIA VNI 
जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू.!
मीडिया वी.एन.आय : 
Jammu Kashmir Terror Attack:
जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झालाय. मिनि स्वित्झर्लंड समजल्या जाणाऱ्या बैसरन व्हॅलीत घडलेल्या घटनेनं देश हादरलाय.
हल्ल्यातून वाचलेले पर्यटक जीव वाचवण्यासाठी पळत होते. तेव्हा महिलांसह मुलांचा एक ग्रुप भारतीय जवान जिथं होते तिथं पोहोचला. अचानक लष्करी वेषात जवानांना पाहून हल्ल्यातून बचावलेले पर्यटक आणखी घाबरले. कारण दहशतवादी हल्ला करणारेसुद्धा लष्करी गणवेशात आले होते. यामुळे महिला त्यांना पाहून मुलांना मारू नका. हवं तर मला मारा अशी विनवणी केली. भारतीय जवानांनी आम्ही इंडियन आर्मीच आहोत म्हणताच महिला रडायला लागली. दहशतवाद्यांनी पतीला मारल्याचं तिने सांगितलं.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतरचा हा व्हिडीओ मन हेलावणारा आहे. पतीला डोळ्यासमोर गोळी मारल्यानंतर मुलांना वाचवत महिला एका ठिकाणी पोहोचते. जेव्हा तिला लष्कराच्या गणवेशात काही व्यक्ती दिसल्या तेव्हा तिला रडू कोसळलं. आम्ही सैनिक आहोत असं सांगताच तिला दिलासा मिळाला. त्यानंतर काय घडलं हे तिनं सांगितलं.
दहशतवादी हल्ला करणारे लष्कराच्या गणवेशात आले होते. त्यामुळे जेव्हा भारतीय लष्करातील सैनिक समोर आले तेव्हा ती प्रचंड घाबरली. भारतीय लष्कराच्या जवानांनी तिला आधार दिला आणि त्यातील जखमींवर प्रथमोपचार केले.
भारतीय लष्कराच्या जवानांनी घाबरलेल्या पर्यटकांना बसण्यासाठी सांगितलं. तुमच्या मुलांना काही होणार नाही असा दिलासा दिला. महिलेनं सांगितलं की, आम्ही हैदराबादहून आलोय. व्हिडीओमध्ये लहान मुलांच्या चेहऱ्यावरही भीती दिसतेय. गोळीबारात पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीने मला मारा असंही लष्कराला म्हटलं.
27 people died in a terrorist attack in Jammu and Kashmir's Pahalgam.
 #MediaVNI #India 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->