लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन चे क्रीडापटू राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत चमकले.!
● मोनिका सन्नू मडावीची हाय जंपमध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.!
● तसेच, लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन च्या आठ विद्यार्थ्यांची १८ वर्षांखालील गटात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या शिबिरासाठी निवड.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली/एटापल्ली : लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन च्या हेडरी येथील क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेतलेल्या दोन विद्यार्थ्यांनी १८ आणि १९ मे रोजी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर (अंडर-२०) ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा-२०२५ मध्ये उंच उडी आणि १०,००० मीटर शर्यतीत अनुक्रमे दुसरे आणि चौथे स्थान मिळवून गडचिरोली जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
महाराष्ट्र राज्य ज्युनियर (अंडर-२०) ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा-२०२५ मध्ये, एटापल्ली येथील मोनिका सन्नू मडावीने उंच उडी स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले आणि तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन च्या क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेतलेला आणखी एक विद्यार्थी यश पांढेकर याने अॅथलेटिक्स स्पर्धेत १०,००० मीटर शर्यतीत चौथा क्रमांक पटकावला.
![]() |
याशिवाय, विदर्भ राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा-२०२५ साठी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय निवड चाचण्यांमध्ये, लॉयड्स क्रीडा संकुलाच्या आठ विद्यार्थ्यांची १८ वर्षांखालील गटात राज्य शिबिरासाठी निवड झाली. यामध्ये पाच मुली आणि तीन मुलांचा समावेश आहे. राज्य शिबिरासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये उडेरा गावातील पायल तलांडी आणि समीरा गोटा, तुमरगुंडा येथील विद्या गावडे, वांगेतुरी येथील आशा नरोटी, मरकल येथील सपना पुंगाटी, कोनसारी येथील महाश कुडे आणि स्वतंत्र आडे, आणि तुमरगुंडा येथील अमोल वारसे यांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय निवड चाचण्या उमरी (अकोला) येथील जगदंबा स्पोर्टिंग क्लब येथे घेण्यात आल्या. राज्य शिबिर २२ मे रोजी गडचिरोली येथे होणार आहे.
याआधी, या वर्षी जानेवारीमध्ये, गडचिरोली जिल्ह्यातील रामकृष्णपूर गावातील सुजिता बिश्वासने नागपूर येथील समर्थ व्यायाम शाळा येथे महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत १८ वर्षांखालील (मुली) गटात तिसरे स्थान पटकावले होते. तिची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन ह्यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक स्पर्धेत, लॉयड्स प्रशिक्षित विद्यार्थी आपला ठसा उमटवत आहेत आणि गडचिरोली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेला नवीन उंचीवर नेत आहेत.
Athletes of Lloyd's Infinite Foundation shine in state level athletics competition.
#गडचिरोली #gadchiroli #MediaVNI #Maharashtra