दि. 22 जुलै 2025
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मा.खा. डॉ. अशोक नेते यांची एक लाख रुपयांची थेट मदत.! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामाजिक आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मा.खा.डॉ.नेते.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मान. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरातबाजी टाळून “मुख्यमंत्री सहाय्यता निधी”स योगदान देण्याचे केलेले आवाहन सकारात्मक कृतीत रूपांतरित करत, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी एक लाख रुपयांची थेट मदत दिली आहे.
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत डॉ. नेते यांनी सोमवार, दि. २१ जुलै रोजी आयसीआयसीआय बँकेमार्फत RTGS द्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांचा निधी जमा केला.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वाढदिवसाचा सार्वजनिक उत्सव न करता समाजोपयोगी कार्यासाठी निधी वापरण्याचं आवाहन केलं होतं. जाहिराती, फलक, पुष्पगुच्छ किंवा हार यावर अनावश्यक खर्च टाळावा, असे आवाहन करत त्यांनी लोकप्रतिनिधींना आणि नागरिकांना विधायक उदाहरण घालून दिले होते.
या प्रेरणेने मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी पुढाकार घेत निव्वळ प्रतीकात्मक नव्हे तर प्रभावी सामाजिक योगदान दिले. त्यांच्या या कृतीतून सामाजिक जाणिवता घडते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर राज्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत करणे, तसेच अत्यवस्थ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी होतो. त्यामुळे या निधीला दिलेले योगदान म्हणजे माणुसकीच्या कार्यात केलेली प्रत्यक्ष मदत होय.
“या कृतीतून इतर लोकप्रतिनिधी, समाजसेवक व नागरिकांनी प्रेरणा घ्यावी आणि आपापल्या परीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सहभाग नोंदवावा, हीच अपेक्षा आहे,” असे डॉ. नेते यांनी नम्रपणे सांगितले.
या उदाहरणातून केवळ आर्थिक मदत नव्हे, तर संवेदनशील नेतृत्व व जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. अशोकजी नेते यांची प्रतिमा अधिक उजळली आहे.
Dr. Ashok Nete's direct contribution of one lakh rupees to the Chief Minister's Relief Fund!
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #MediaVNI