राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर.!

दि. 06 ऑक्टोंबर 2025  
MEDIA VNI
राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर.!
मीडिया वी.एन.आय : 
​मुंबई: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोगाने मोठी तयारी सुरू केली असून, २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. यामुळे आता राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग येणार असून, कोण सत्तेची खुर्ची मिळवणार, याची उत्सुकता वाढली आहे.

​एकूण ७४ जागा राखीव
​निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षणानुसार, एकूण ७४ जागा विविध प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी ३८ जागा, अनुसूचित जातीसाठी ७ जागा, अनुसूचित जमातीसाठी २० जागा आणि मागास प्रवर्गासाठी (OBC) ७ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

​ओबीसींसाठी ६७ नगर परिषदा आरक्षित
​सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे, राज्यातील ६७ नगर परिषदांच्या अध्यक्षपदासाठी ओबीसी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या ६७ जागांपैकी तब्बल ३४ जागा ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
​ओबीसींसाठी आरक्षित झालेल्या प्रमुख नगर परिषदा:
तिरोडा, वाशिम, धामणगाव, भोकरदन, भद्रावती, परांडा, भगूर, मालवण, नंदुरबार, खापा, वरोरा, हिंगोली, मोर्शी, शहादा, उमरेड, नवापूर, त्र्यंबक, कोपरगाव, शिरूर, कुळगाव-बदलापूर, मंगळूरपीर, पाथर्डी, देगलूर, धाराशिव, इगतपुरी, रामटेक, माजलगाव, पालघर, मूल, वरणगाव, बल्हारपूर, मलकापूर (बुलढाणा), इस्लामपूर, जुन्नर, कुरडुवाडी, तुमसर, औसा, महाड, मुरुड जंजिरा, अकोट, चोपडा, सटणा, काटोल, गोंदिया, सांगोला, दौंड, राहता, श्रीवर्धन, रोहा, ब्रम्हपुरी, देसाईगंज, येवला, कर्जत, दौंडाईचा-वरवडे, कंधार, शिरपूर-वरवडे.
ओबीसी महिलांसाठी आरक्षित झालेल्या प्रमुख नगर परिषदा (३४ जागा):
भगूर, इगतपुरी, विटा, बल्हारपूर, धाराशिव, भोकरदन, जुन्नर, उमरेड, दौंड, कुळगाव-बदलापूर, हिंगोली, फुलगाव, मुरुड जंजिरा, शिरूर, काटोल, माजलगाव, मूल, मालवण, देसाईगंज, अकोट, मोर्शी, औसा, कर्जत, देगलूर, चोपडा, सटाणा, दोंडाईचा-वरवडे, बाळापूर, रोहा, कुरडुवादी, धामणगाव रेल्वे, वरोरा.
​अनुसूचित जाती (SC) महिलांसाठी १७ जागा निश्चित
​अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी १७ नगर परिषदेच्या जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.
आरक्षित नगर परिषदा (SC महिला):
देऊळगावराजा, मोहोळ, तेल्हारा, ओझर, वानाडोंगरी, भुसावळ, घुग्गूस, चिमूर, शिर्डी, सावदा, मैनदर्गी, दिगडोहदेवी, दिग्रस, अकलूज, बीड, शिरोळ.

​खुला महिला प्रवर्ग (३८ जागा)
​निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ३८ महिला खुला प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या नगर परिषदांमध्ये परळी वैजनाथ, पंढरपूर, बार्शी, खामगाव, गंगाखेड, गडचिरोली, भंडारा, बुलढाणा, पैठण, रत्नागिरी, करमाळा, वसमत, हिंगणघाट, रावेर, तासगाव, राजापूर, जामखेड, शेवगाव, लोणार, हडगाव, उमरखेड, उदगीर, अलिबाग अशा महत्त्वाच्या नगर परिषदांचा समावेश आहे.
​या आरक्षणामुळे अनेक विद्यमान नगराध्यक्षांना आता दुसऱ्या जागेवर किंवा प्रवर्गात नशीब आजमावावे लागणार आहे. निवडणुकीचे बिगुल जवळ आल्याने राजकीय पटलावर मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
Reservation for the post of Mayor of 247 Municipalities and 147 Nagar Panchayats in the state has been announced.!
#Maharashtra #MediaVNI 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->