दि. 11 डिसेंबर 2025
गडचिरोलीला जमशेदपूरपेक्षा मोठे स्टील सिटी बनवणे हे माझे ध्येय – बी. प्रभाकरण.! मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोलीला राष्ट्रीय आणि जागतिक कौशल्य विकास केंद्रामध्ये रूपांतरित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत, लॉयड्स मेटल्स अॅड एनर्जी लिमिटेड (LMEL) ने आज लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप (LMGSE) या उपक्रमाची सुरुवात केली.हा उपक्रम लॉयड्स मेटल्स अॅड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण यांच्या हस्ते तसेच अल्का मिश्रा (चेअरपर्सन स्किल डेव्हलपमेंट), LICL चे एमडी व्यंकटेश संधिल आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली सुरू झालेली ही योजना गडचिरोलीतील युवकांच्या सक्षमीकरणासाठी आतापर्यंतच्या सर्वात महत्त्वाकांक्षी उपक्रमांपैकी एक ठरते.या प्रसंगी नव्या प्रशिक्षणार्थी व उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना बी.प्रभाकरण म्हणाले की, त्यांचे उद्दिष्ट गडचिरोलीला जमशेदपूरपेक्षाही मोठे स्टील सिटी म्हणून विकसित करण्याचे आहे.त्यांनी सांगितले की भारताचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोघेही गडचिरोलीच्या विकासाबाबत अत्यंत सकारात्मक व उत्सुक आहेत आणि लॉयड्स कंपनी या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.
LMGSE अंतर्गत दिले जाणारे विविध प्रशिक्षण जसे वेल्डिंग, प्लंबिंग, ट्रान्सपोर्ट, इतर तांत्रिक कौशल्ये यामुळे येथील युवकांना रोजगारक्षम बनवण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या मिशनचे उद्दिष्ट म्हणजे कौशल्यातील गंभीर अंतर भरून काढणे, उद्योगाच्या वास्तविक गरजांशी प्रशिक्षणाची जुळवणी करणे आणि विशेषतः वंचित समुदायांसाठी शाश्वत आजीविका निर्माण करणे. जागतिक रोजगार संधी व स्थानिक विकास यांना एकत्र करून, LMGSE गडचिरोलीच्या युवकांना नव्या आणि हरित उद्योगांमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संधींशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे.
३०० विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीने नवीन कौशल्य चळवळीची सुरूवात
!!!
९० दिवसांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात ४५ दिवसांचे प्रशिक्षण आणि ४५ दिवसांची ऑन-जॉब ट्रेनिंग यांचा समावेश आहे.पहिल्या तुकडीत ३०० विद्यार्थी बार-बेंडिंग आणि शटरिंग या उच्च मागणी असलेल्या ट्रेड्समध्ये प्रशिक्षण घेत आहेत.ही तुकडी गडचिरोलीत व्यापक आणि शिस्तबद्ध कौशल्य चळवळ सुरू होण्याचे प्रतीक आहे.
LMGSE ने पहिल्या वर्षात १० हजार युवकांना प्रशिक्षण देण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. या प्रयत्नामुळे गडचिरोलीच्या दीर्घकालीन आर्थिक परिवर्तनाचा पाया रचला जाईल, रोजगार संधी वाढतील आणि स्थानिक उद्योगांत सहभाग वाढेल.या मिशनची खास वैशिष्ट्य म्हणजे कौशल्य विकासासोबतच टिकाऊपणा-ज्यामुळे विशेषतः महिला आणि हाशियावरील गटातील युवकांना आधुनिक, पर्यावरणपूरक क्षेत्रात स्थिर करिअर घडवण्याची संधी मिळेल.
