दि. 14 डिसेंबर 2025
MEDIA VNI
प्रमोद पिपरे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमानी साजरा.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : शनिवार दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने व सामाजिक जाणिवेने साजरा करण्यात आला. भाजपा लोकसभा समन्वयक तथा संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे, जिल्हाध्यक्ष – महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासंघ, जिल्हा गडचिरोली, तसेच माजी सभापती नगरपरिषद गडचिरोली असलेल्या प्रमोद भाऊंनी आपल्या वाढदिवसाची सुरुवात सकाळी सेमना देवस्थान येथे सहपत्नीक पूजाअर्चा करून केली.
यानंतर त्यांनी निवासी अपंग विद्यालय, लांजेडा (स्नेहनगर) येथे भेट देत अपंग विद्यार्थ्यांसोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक ठरला. या प्रसंगी अपंग विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच केक व लाडू देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
“आपला वाढदिवस साधेपणाने, समाजातील दुर्बल घटकांसोबत साजरा करावा” हीच प्रमोद भाऊंची जीवनदृष्टी असून, सामान्य माणसाची ओळख त्यांनी पुन्हा एकदा कृतीतून दाखवून दिली. अपंग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या सोबत वेळ घालवून त्यांनी खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, भाजपा, रमेश भूरसे प्रदेश सचिव, किसान आघाडी भाजपा,
अनुराग पिपरे संचालक, पिपरे पेट्रोलपंप, गडचिरोली,कविता उरकुडे जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा महिला आघाडी, रोशनी बानमारे कोषाध्यक्ष, शहर महिला आघाडी,पूनम हेमके शहर अध्यक्ष, एनटीविजे,तसेच राजु शेरकी, दिनेश भूरसे, लोकेश पिपरे, संकेत सेलोटे,शाळेचे मुख्याध्यापक भास्कर दोनाडकर, अधीक्षक उमेश देशमुख व मोठ्या संख्येने अपंग विद्यार्थी उपस्थित होते.
सामान्य माणसांमध्ये जाऊन, समाजातील दुर्बल घटकांसोबत आनंद साजरा करणारे प्रमोद पिपरे हे आजही “सामान्य लोकांचा सामान्य माणूस” असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.