दि. 26 डिसेंबर 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेचे उद्घाटन.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे मेसर्स लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड समवेत सार्वजनिक खाजगी-भागीदारी तत्वावर आयोजित संस्था 'विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था'गडचिरोलीचे उद्घाटन समारंभ २७ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते अडपल्ली येथे होणार आहे.
समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, विशेष अतिथी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लि.चे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन, खासदार डॉ. नामदेव किरसान, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार रामदास मसराम, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लि. चे लेफ्टनंट कर्नल विक्रम मेहता, कार्यकारी संचालक व्यंकटेश सौंदर्यराजन, निवासी संचालक लॉर्ड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड हिंम्मत सिंग बेदला, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेत प्रवेशित विद्यार्थ्यांना विदेशी विद्यापीठात शिकण्याची संधी प्राप्त होणार आहे. ही तंत्रज्ञान संस्था गडचिरोली या मागास जिल्ह्यातील होतकरू व गुणवंत युवकांच्या तंत्र कौशल्य शिक्षणासाठी महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
या कार्यक्रमात युथ पॅरा गेम्स दुबई ची विजेती श्वेता कोवे हिचा सन्मान देखील करण्यात येणार आहे.
जिल्हा मुख्यालयानजीकच्या अडपल्ली येथील विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेच्या उद्घाटन समारोहाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, विद्यापीठाचे न. न. व. सा. संचालक तथा युआयटी प्रभारी संचालक प्रा. मनिष उत्तरवार यांनी केले आहे.
