गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य “गडचिरोली महोत्सव व महामॅरेथॉन २०२५” चे आयोजन.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य “गडचिरोली महोत्सव व महामॅरेथॉन २०२५” चे आयोजन.!

दि. 25 डिसेंबर 2025 
MEDIA VNI
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य “गडचिरोली महोत्सव व महामॅरेथॉन २०२५” चे आयोजन.! 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, माओवादग्रस्त, अतिसंवेदनशिल व आदिवासी बहुल असून येथील आदिवासी नागरीकांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्याकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘पोलीस दादालोरा खिडकी व प्रोजेक्ट उडान’ च्या माध्यमातून विविध शासकिय योजना मिळवून देत विकासाच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्रातील आदिवासी बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याकरीता व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने दिनांक २५ डिसेंबर ते २७ डिसेंबर रोजी गडचिरोली पोलीस दलामार्फत भव्य “गडचिरोली महोत्सव” चे आयोजन शासकीय कृषी महाविद्यालय गडचिरोली व दि. २८ डिसेंबर रोजी “महामॅरेथॉन २०२५ सिझन-३” चे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील जिल्हा परिषद कार्यालयाचे प्रांगणात करण्यात आले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने आयोजित केलेल्या भव्य गडचिरोली महोत्सव ३ दिवस चालणार असून, या महोत्सवाचे विशेष आकर्षण आदिवासी समुह नृत्य स्पर्धा, वीर बाबुराव शेडमाके कब्बड्डी स्पर्धा व बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा असून दुर्गम व अतिदुर्गम भागातून आलेल्या संघामध्ये ह्रा स्पर्धा अत्यंत चुरशीच्या होणार आहेत.

तसेच गडचिरोली जिल्ह्रातील विविध बचत गट तसेच विविध संस्था आपले उत्पादनाचे व वस्तुंचे स्टॉल लावणार आहेत. यासोबतच हस्तकलेच्या वस्तुंचे स्टॉल उपस्थित नागरीकांरीता उपलब्ध असणार आहेत. तसेच दि.२६ व २७ डिसेंबर सायंकाळी ६ ते १० वाजता सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास महाराष्ट्राचे प्रसिध्द कलाकार सहभागी होणार आहेत. यामध्ये सुरेश वाडकर (प्रसिद्ध गायक), भारत गणेशपूरे (चला हवा येऊ द्या फेम), कुशल बद्रिके (चला हवा येऊ द्या फेम), हेमांगी कवी (चला हवा येऊ द्या फेम), ममता उईके (‘ओ सांगो’ गोंडी साँग फेम), निरंजन बोबडे (झी मराठी सारेगमप विजेता), माधुरी पवार (मराठी सिने अभिनेत्री), पद्मनाभन गायकवाड (सुप्रसिद्ध मराठी गायक) व अर्जुन धोपटे (‘ओ सांगो’ गोंडी साँग फेम) हे आपली कला सादर करणार आहेत. तसेच गडचिरोली जिल्ह्रातील स्थानिक कलाकारांनी सहभाग घेतला आहे.

तसेच महामॅरेथॉन २०२५ या स्पर्धेत जिल्ह्रातील १४ हजार हुन अधिक स्पर्धक सहभाग होणार आहे. सदर स्पर्धेत वेगवेगळया वयोगटासाठी वेगवेगळे अंतर असून त्यामध्ये २१ किमी, १० किमी, ५ किमी, ३ किमी. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्व सहभागी होण्या­या धावपटंुना टी-शर्ट, मेडल, हुडी बॅग, प्रमाणपत्र, झंुबा सेशन, अल्पोपहार व विजेत्यांसाठी स्पर्धकांना पुरुष व महिला या वेगवेगळ्या दोन्ही प्रवर्गामध्ये २१ कि.मी गटात प्रथम ५१ हजार, द्वितीय ३१ हजार व तृतीय २१ हजार रुपये, १०कि.मी गटात प्रथम २१ हजार, द्वितीय १५ हजार व तृतीय ११ हजार, ५ कि.मी गटात प्रथम १५ हजार, द्वितीय ११ हजार व तृतीय ८ हजार व ३ कि.मी गटात प्रथम ११ हजार,द्वितीय ७ हजार व तृतीय ३ हजार रुपये असे एकूण ४ लक्ष १४ हजार रुपयांच्या बक्षीसाचे वितरण करण्यात येणार आहे. तरी या सर्व खेळाडू व कलाकारांचा उत्साह द्विगुणीत करण्याकरीता सर्व नागरीकांनी या महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

सदर गडचिरोली महोत्सव व महामॅरेथॉन २०२५ चे संपुर्ण तयारी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज. यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक, धानोरा अनिकेत हिरडे व सर्व शाखा प्रभारी अधिकारी व अंमलदार करीत आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->