बनावट नियुक्तीपत्राच्या आमिषाने ५.४० लाखांची लूट; जिल्हा परिषद व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या नावाचा गैरवापर! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

बनावट नियुक्तीपत्राच्या आमिषाने ५.४० लाखांची लूट; जिल्हा परिषद व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या नावाचा गैरवापर!

दि. 06 जुलै 2026 
MEDIA VNI 
बनावट नियुक्तीपत्राच्या आमिषाने ५.४० लाखांची लूट; जिल्हा परिषद व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या नावाचा गैरवापर!
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सरकारी नोकरीचे आमिष दाखवत बनावट नियुक्तीपत्र तयार करून तब्बल ५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषद आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) यांच्या नावाचा गैरवापर करून तीन महिला उमेदवारांना नोकरीचे आमिष दाखवण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी कंत्राटी समाज आरोग्य सहाय्यक आणि शिपाई पदावर नियुक्ती मिळवून देण्याचे आश्वासन देत सप्टेंबर २०२५ पासून टप्प्याटप्प्याने पैसे उकळले. काही रक्कम रोख तर काही ऑनलाइन स्वीकारून एकूण ₹५.४० लाख घेतल्याचा आरोप आहे.
विश्वास बसावा म्हणून आरोपींनी जिल्हा परिषद आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या नावाने बनावट नियुक्ती आदेश, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या, शिक्के आणि कार्यालयीन नमुने तयार केले. मात्र संबंधित विभागाकडून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर सर्व दस्तऐवज बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर जिल्हा परिषदेने अधिकृत तक्रार दाखल केली असून, या प्रकरणात सरकारी भरतीच्या नावाखाली कार्यरत असलेल्या मोठ्या रॅकेटची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या बनावट भरतीच्या जाहिराती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्या युवक-युवतींनी कोणत्याही भरतीसाठी पैसे भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून माहितीची खात्री करूनच पुढील प्रक्रिया करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
₹5.40 lakh swindled with the lure of a fake appointment letter; misuse of Zilla Parishad and National Health Mission names!
#MediaVNI #Gadchiroli #ZP #job #Maharashtra #Scam 

Share News

copylock

Post Top Advertisement

(MEDIA VNI)

Chief Editor, Founder & Director

"Mr. Rajesh Khobragade"

Educational Qualifications :- BA, MA, B.ED, MAJMC, MBA...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->