गडचिरोली : प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक; दोघांना अटक.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गडचिरोली : प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक; दोघांना अटक.!

दि. 08 ऑगस्ट 2026
MEDIA VNI 
गडचिरोली : प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक; दोघांना अटक.! 
- गडचिरोली पोलिसांची कारवाई; ९ लाख ७२ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त.! 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर कायदेशीर प्रतिबंध घातला असून, जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सर्व पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे व पोलीस मदत केंद्रांना दिले आहेत. या अनुषंगाने गडचिरोली पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून तब्बल ९ लाख ७२ हजार ७२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक, गडचिरोली अनिकेत हिरडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती आपल्या साथीदारासह चारचाकी वाहनातून गडचिरोली-चामोर्शी मार्गावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत आहे.

माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे व त्यांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सी वरील पोहार नदीच्या पुलाजवळ, कुरुड गाव परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित बोलेरो मॅक्स पिकअप वाहन क्रमांक एमएच-३३ टी-५८९२ येताना दिसताच पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली.

वाहनातील व्यक्तींची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे नंदकिशोर दिवरुजी शेट्टे (वय २१, रा. चामोर्शी) आणि राजेंद्र ईश्वर नैताम (वय २१, रा. मार्कड मोहल्ला, ता. चामोर्शी) अशी सांगितली.

पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये विविध प्रकारचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला. त्यामध्ये ‘होला हुक्का टोबॅको’चे २०० ग्रॅम वजनाचे १,८०० पॅकेट्स (किंमत अंदाजे ४ लाख ७७ हजार रुपये), ‘मजा’ सुगंधित तंबाखूचे ५० ग्रॅम वजनाचे ४०० डबे (१ लाख १४ हजार रुपये), ‘ईगल’चे ११५ पॅकेट्स (४७ हजार ७२५ रुपये), तसेच ‘ईगल हुक्का शिशा तंबाखू’चे ४० ग्रॅम वजनाचे ४०० डबे (३४ हजार रुपये) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यासोबतच तंबाखूच्या अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले बोलेरो मॅक्स पिकअप वाहन (एमएच-३३ टी-५८९२), अंदाजे किंमत ३ लाख रुपये, असे मिळून एकूण ९ लाख ७२ हजार ७२५ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांनी दोन्ही आरोपींकडे चौकशी केली असता, सदर तंबाखूचा माल चंद्रकांत शत्रुघ्न पिपरे, रा. चामोर्शी याने आणण्यास सांगितल्याचे तसेच वाहनही त्याच्याच मालकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोलीचे अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश पोसन्ना तोर्रेम यांच्या फिर्यादीवरून चामोर्शी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ४१०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता-२०२३ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-२००६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी नंदकिशोर दिवरुजी शेट्टे आणि राजेंद्र ईश्वर नैताम यांना अटक करण्यात आली असून, पाहिजे असलेला आरोपी चंद्रकांत शत्रुघ्न पिपरे याचा शोध सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मानकर, पोलीस ठाणे चामोर्शी करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज. जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे व त्यांच्या पोलीस पथकाने केली.

Share News

copylock

Post Top Advertisement

(MEDIA VNI)

Chief Editor, Founder & Director

"Mr. Rajesh Khobragade"

Educational Qualifications :- BA, MA, B.ED, MAJMC, MBA...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->