दि. 25 सप्टेंबर 2026
मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त २९ सप्टेंबरला गडचिरोली दौऱ्यावर.!
- मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाच्या कामकाजाचा घेणार आढावा.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : दि. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी या दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीत निरीक्षकांकडून जिल्ह्यातील मतदार यादीविषयक कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे.
या दौऱ्यादरम्यान दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असून, मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा तसेच दावे व हरकतींसंदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेतला जाणार आहे.
अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली आहे.
Electoral Roll Observer and Divisional Commissioner to visit Gadchiroli on September 29! - Will review the progress of the electoral roll revision program!
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #MediaVNI #BreakingNews