निमगांव प्रकरणावरून गडचिरोलीत संतापाचा उद्रेक! तहसीलदार गणेश माळी यांच्या निलंबनाची मागणी; शेकडो नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

निमगांव प्रकरणावरून गडचिरोलीत संतापाचा उद्रेक! तहसीलदार गणेश माळी यांच्या निलंबनाची मागणी; शेकडो नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा!

दि. 21 नोव्हेंबर 2026 
MEDIA VNI 
निमगांव प्रकरणावरून गडचिरोलीत संतापाचा उद्रेक! तहसीलदार गणेश माळी यांच्या निलंबनाची मागणी; शेकडो नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा!
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील निमगाव येथील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईवरून आता प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. निमगाव येथील पंचशील ध्वज आणि धम्मखांब हटविण्याच्या निषेधार्थ २० नोव्हेंबर रोजी शेकडो नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार निदर्शने केली. या आंदोलनातून तहसीलदार गणेश माळी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली.

नेमके प्रकरण काय?

निमगाव येथे गेल्या दहा वर्षांपासून बौद्ध समाजाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसह विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी एका जागेचा वापर केला जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. ही जागा समाजाला मिळावी, यासाठी अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे मागणी करण्यात येत होती.

दरम्यान, २०२३ मध्ये जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित जागेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश धानोरा तहसीलदारांना दिले होते. मात्र, कोणतीही ठोस चौकशी न करता तसेच समाजाला पूर्वसूचना किंवा नोटीस न देता १८ नोव्हेंबर रोजी पोलीस बंदोबस्तात पंचशील ध्वज आणि धम्मखांब हटविण्यात आल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी निवेदनातून केला आहे.

तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी!

या संपूर्ण प्रकरणात तहसीलदार गणेश माळी यांच्या भूमिकेवर आंदोलनकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि तहसीलदारांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक बाळू टेंभुर्णी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एकत्र येत घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; चौकशीचे आश्वासन!

आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी स्मिता बेलमपल्ले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती आहे.

या आंदोलनात नगरसेवक बाळू टेंभुर्णी, जी. के. बारसिंगे, विलास केळझरकर, नामदेव दुखे, शीतल मेश्राम, प्रा. मुनीश्वर बोरकर, सुधीर वालदे, राहुल वासनिक, चरणदास खोब्रागडे, प्रकाश शेंडे, प्रशांत नगराळे, करुणा बोरकर, रसिका बोरकर, मंगला आबादे, नीलेश तटवारे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

आता प्रशासन काय भूमिका घेणार?

निमगाव येथील जागेचा प्रश्न, पंचशील ध्वज व धम्मखांब हटविण्याची कारवाई आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी या मुद्द्यांवरून हे प्रकरण चांगलेच तापले आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या चौकशीच्या आश्वासनानंतर आता प्रत्यक्षात कोणती कारवाई होते, याकडे निमगावसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

प्रश्न एकच — समाजाच्या मागण्यांची दखल घेऊन प्रशासन संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार का? की नागरिकांना न्यायासाठी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार?

Share News

copylock

Post Top Advertisement

(MEDIA VNI)

Chief Editor, Founder & Director

"Mr. Rajesh Khobragade"

Educational Qualifications :- BA, MA, B.ED, MAJMC, MBA...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->