खाणविरोधी लढ्याचे नेतृत्व स्थानिकांनीच करावे! नेत्यांच्या भरवशावरचे आंदोलन टिकणार नाही; राज बन्सोड यांचे पुसेर महाग्रामसभेत स्पष्ट प्रतिपादन! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

खाणविरोधी लढ्याचे नेतृत्व स्थानिकांनीच करावे! नेत्यांच्या भरवशावरचे आंदोलन टिकणार नाही; राज बन्सोड यांचे पुसेर महाग्रामसभेत स्पष्ट प्रतिपादन!


दि. 21 नोव्हेंबर 2026 
MEDIA VNI 
खाणविरोधी लढ्याचे नेतृत्व स्थानिकांनीच करावे! नेत्यांच्या भरवशावरचे आंदोलन टिकणार नाही; राज बन्सोड यांचे पुसेर महाग्रामसभेत स्पष्ट प्रतिपादन!
- ग्रामसभांच्या घटनात्मक अधिकारांचा प्रभावी वापर करा; बाहेरील नेत्यांनी नेतृत्व नव्हे, तर कार्यकर्ता म्हणून साथ द्यावी – राज बन्सोड.! 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील पुसेर येथे प्रस्तावित खाण प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या महाग्रामसभेत खाणविरोधी लढ्याच्या नेतृत्वाचा मुद्दा ऐरणीवर आला. "ज्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांनीच आपल्या हक्कासाठी स्वतःचा लढा उभारला पाहिजे. नेते आणि राजकीय पक्षांच्या भरवशावर उभे राहणारे लढे दीर्घकाळ टिकत नाहीत," असे स्पष्ट मत आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी व्यक्त केले.

महाग्रामसभेचे जिल्हाध्यक्ष नितीन पदा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला विविध तालुक्यांतील ग्रामसभांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी देवाजी तोफा, शिवाजी राऊत, केसरी पाटील मटामी, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, विवेक खोब्रागडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.

सभेत मार्गदर्शन करताना राज बन्सोड यांनी खाण प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिणामांचा मुद्दा उपस्थित केला. खाण प्रकल्पांचे प्रत्यक्ष परिणाम स्थानिक नागरिकांना भोगावे लागतात. त्यामुळे या संघर्षाचे नेतृत्वही स्थानिक ग्रामस्थांनीच केले पाहिजे. बाहेरून येणारे नेते, राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी स्वतः नेतृत्व करण्याऐवजी स्थानिकांच्या लढ्याला कार्यकर्ता म्हणून साथ द्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

ग्रामसभांचे घटनात्मक अधिकार ठरणार संघर्षाचे प्रभावी हत्यार!

पुढे बोलताना त्यांनी ग्रामसभांना संविधानाने आणि कायद्याने दिलेल्या अधिकारांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभांच्या अधिकारांचा मुद्दा खाण प्रकल्पाविरोधातील संघर्षात महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

२९ नोव्हेंबरला गडचिरोलीत 'जनता अवेक इंडिया संमेलन'

दरम्यान, येत्या २९ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे 'जनता अवेक इंडिया संमेलन' आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज बन्सोड यांनी दिली. या संमेलनात देशातील विविध आदिवासी अभ्यासक आणि विचारवंत सहभागी होऊन आदिवासी समाजाचे मूलभूत प्रश्न, पेसा कायदा, वनहक्क आणि संवैधानिक अधिकार या महत्त्वपूर्ण विषयांवर मंथन व मार्गदर्शन करणार आहेत.
या संमेलनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या हक्कांबाबत जनजागृती आणि वैचारिक संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार असून, जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
एकंदरीत, पुसेर येथील महाग्रामसभेतून खाण प्रकल्पाविरोधातील संघर्षात स्थानिक ग्रामसभांचे नेतृत्व, जनसहभाग आणि घटनात्मक अधिकारांचा प्रभावी वापर यावर भर देण्यात आला.


Share News

copylock

Post Top Advertisement

(MEDIA VNI)

Chief Editor, Founder & Director

"Mr. Rajesh Khobragade"

Educational Qualifications :- BA, MA, B.ED, MAJMC, MBA...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->