दि. 07.09.2023
MEDIA VNI
Talathi Viral Video: दारु पिऊन कार्यालयात आला, सातबाऱ्यावर सही करताना खुर्चीवरुन पडला; मद्यधुंद तलाठ्याचा व्हिडिओ
Gadchiroli Talathi Drunk Viral Video:
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क सरकारी कर्मचारीच दारु ढोसून कर्तव्यावर येत असल्याचं उघड झालं आहे.
या व्हिडीओत तलाठी महोदय चक्क दारू ढोसून कार्यालयात आल्याचं दिसून येत आहे. गंभीर बाब म्हणजे या तलाठ्याकडे परिसरातील काही शेतकरी सातबारा काढण्यासाठी आले होते. यावेळी सातबाऱ्यावर सही करतानाच तो खाली पडल्याचं दिसून येत आहे. किशोर राऊत असं या मद्यधुंद तलाठ्याचं नाव आहे. (Latest Marathi News)
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील कुरखेड तालुक्यातल्या सजा क्रमांक 8 सोनेरांगी येथे किशोर राऊत हे तलाठी पदावर कार्यरत आहेत. गेल्या 8 दिवसांपासून ते कार्यालयात मद्यपान करून येत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत.
तलाठी महोदयच दारूच्या नशेत असल्यामुळे गेल्या आठवडाभरापासून शेतीसाठी लागणारे सातबारे तसेच दाखल्यांची कामे होत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात काही शेतकऱ्यांनी मंडळ अधिकाऱ्यांकडे देखील तक्रारी केल्या असून अजूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, बुधवारी सोनेरांगी गावातील काही शेतकरी शेतीविषयक कामासाठी तलाठी कार्यालयात गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी राऊत यांच्याकडे काही कागदपत्रांवर सही करण्याची विनंती केली. मात्र, दारूच्या नशेत असल्याने राऊत यांना सही करण्याची देखील शुद्ध नव्हती.
सही करता-करता अचानक राऊत हे जमिनीवर कोसळले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी त्यांना उचलून बाजूच्या खोलीत नेत एका खाटेवर झोपवले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला असून व्हिडीओ व्हायरल होताच संताप व्यक्त केला जात आहे. या दारुड्या तलाठ्याला तातडीने निलंबित करा, अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे.
◆ Video व्हिडिओ बघण्यासाठी खालील ब्लू लिंक ला क्लिक करा.
👇👇
https://youtu.be/jCVSCmHRpww?si=rxWOAXcBB4H29Hpk