दि. 20.10.2023
वीर बाबुराव शेडमाके बलिदान स्मृतीदिन निमित्य गोंडवाना विद्यापीठात व्याख्यानाचे आयोजन
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : आदिवासी अध्यासन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या वतीने २१ ऑक्टोबर २०२३, शनिवार ला स.११:३० वाजता विद्यापीठ सभागृह येथे वीर बाबुराव शेडमाके बलिदान स्मृती दिन निमित्य “आदिवासी नायक: वीर बाबुराव शेडमाके” या विषयवार व्याख्यान चे आयोजन करण्यात येत आहे.
१८५७ च्या स्वातंत्र लढ्यातील आदिवासी वीर क्रांतिकारक बाबुराव शेडमाके यांचे मोलाचे योगदान आहे. वयाच्या २५ व्या वर्षी बाबुराव शेडमाके यांनी आपल्या पराक्रमाची खूण दाखवत स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले .
त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव व बलिदान स्मृतीदिनाचे औचित्य साधुन आदिवासी अध्यासन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे वीर बाबुराव शेडमाके बलिदान स्मृती दिन निमित्य “आदिवासी नायक: वीर बाबुराव शेडमाके” या विषयवार व्याख्यानचे आयोजन कुलगुरु डॉ.प्रशान्त बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेले आहे. सदर कार्यक्रमास मुख्य वक्ते सुजाता मडावी, महिला व बाल कल्याण अधिकारी, गोंदिया यांचे मार्गदर्शन लाभणार असुन प्रमुख उपस्थिती डॉ.श्रीराम कावळे. प्र-कुलगुरु व डॉ.अनिल हिरेखन, कुलसचिव उपस्थित राहणार आहे. तरी आदिवासी अध्यासन केंद्रातर्फे या व्याख्यानाला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.वैभव मसराम, समन्वयक यांनी केले आहे.