विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव इंद्रधनुष्य मध्ये तरुणाईची धम्माल - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव इंद्रधनुष्य मध्ये तरुणाईची धम्माल

दि. 20.10.2023
MEDIA VNI 
विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव इंद्रधनुष्य मध्ये तरुणाईची धम्माल
- इंद्रधनुष्य कार्यक्रमाचा बक्षीस वितरण...
- माणसाने माणसाशी माणसासम
वागणे - देवाजी तोफा
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : आंतर महाविद्यालयीन तीन दिवसीय इंद्रधनुष्य महोत्सावाचा समारोप स्थानिक सुमानंद सभागृह इथे नुकताच पार पडला. 
यात शास्त्रीय नृत्य ,लोकनृत्य, मूकनाट्य, नकला, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत ,समूहगीत, शास्त्रीय तालवाद्य ,संगीत शास्त्रीय ताण वाद्य ,पाश्चिमात्य गायन, लोकसंगीत वाद्यवृंद, वादविवाद स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा,  रांगोळी ,स्थळ छायाचित्रण, स्थळ चित्र, पोस्टर मेकिंग, व्यंगचित्र,माती कला, चिकट कला, एकांकिका,प्रहसन, शॉर्ट फिल्म,स्पॉटफोटोग्राफी
आदी कलाप्रकार सादर करण्यात आले. या कलाप्रकारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थितांनी  मनमुराद आनंद लुटला. लोकनृत्यात तर तरुणाई अक्षरशः थिरक्तांना दिसली.
समारोपाच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे,प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ समाजसेवक देवाजी तोफा, सिनेस्टार सौरभ मेश्राम , रासेयो संचालक श्याम खंडारे  तसेच संचालक विद्यार्थीविकास डॉ.प्रिया गेडाम आदींची उपस्थिती होती.
माझ्या गावात शाळा वैगरे नव्हती, लहान असताना वर्दीतले लोकं दिसले की आम्ही पळून जात होतो , बोलता येत नव्हते, 
व्यक्त होता येत नव्हते, भीती वाटत होते, आजही इतर शहरातील लोकं आम्हाला मागासलेले समजतात, मात्र आदिवासी समाजातील संस्कृती कला यांचा आजही अभ्यास केला जातो. जीवनाला धरून गाणे असताना, आमचे कलेतून आम्ही प्रबोधन करतो,आदिवासी आसल्याने लिहता येत नव्हते, बोलता येत नव्हते, मात्र डोक्यात सर्व फिट होते.मग आम्ही अभ्यास केला, संघर्ष केला, महापुरुषांचे विचार आत्मसात केले,
संविधानाचा अभ्यास केला,
जल, जंगल आणि जमिनीवर व्यक्तिगत नाही तर सामूहिक मालकी आहे, आम्ही म्हणून लढा दिला,माणसाने माणसासोबत मानसासारखे वागावे हेच आम्ही शिकलो.असे विचार देवाजी तोफा यांनी व्यक्त केले.

प्र-कुलगुरू : डॉ. श्रीराम कावळे 
इंद्रधनुष्य हा कार्यक्रम राज्यपाल महोदयांनी सुरू केलेला आहे, या स्पर्धेतून ज्या टीम राज्यस्तरीय स्पर्धेत जातील त्यांना एक प्रशिक्षण दिले पाहिजे, आपल्या विद्यापीठाला अधिक चांगले पुरस्कार मिळतील, 
केवळ शिक्षण, नोकरी एवढेच न बघता अशा स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, 
झाडीपट्टी ची रंगभूमी समृद्ध आहे, या झाडीपट्टी मधील अनेक कलावंत आज मुंबई पुण्यात काम करतात,
आपल्यात जे गुण आहेत त्या क्षेत्रात आपण गेले पाहिजे, गोंडवाना विद्यापीठ अशा विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करते.

सिनेस्टार ,सौरभ मेश्राम
संघर्षातून माणूस घडतो... संघर्षातून मिळालेले यश हे समाधान देते.
कलेमध्ये करीयर करण्यासाठी पैसा अडथळा ठरू शकत नाही. फक्त प्रामाणिक प्रयत्न आणि संयम आवश्यक आहे.
मुलांना कुटुंबा मधून प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे अशी आशा व्यक्त केली.
अभिनेता बनण्या पर्यंतचा आपला बाल पणापासूनचा संघर्ष विशद करून मुलांना कला क्षेत्रामध्ये करीयर करण्यासाठी नेहमी मार्गदर्शन करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या कार्यक्रमाचे संचालन सा. प्रा.डॉ. सविता सादमवार, आभार आणि स्पर्धचे अहवाल वाचन संचालक विद्यार्थी विकास डॉ.प्रिया गेडाम
यांनी केले.

स्पर्धेतील विजेते स्पर्धक

शास्त्रीय नृत्य
प्रथम क्रमांक कु· त्रिशला निमगडे
चिंतामणी विज्ञान महाविद्यालय, पोंभुर्णा, जि. चंद्रपूर

द्वितीय क्रमांक
कु. वैष्णवी रानगडे
शिवाजी महाविद्यालय गडचिरोली

लोकनृत्य
प्रथम क्रमांक
श्री. ज्ञानेश महाविद्यालय 
नवरगाव

द्वितीय क्रमांक
ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर

तृतीय क्रमांक
 राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली

एकांकीका
प्रथम क्रमांक
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली

द्वितीय क्रमांक 
कला, वाणिज्य महाविद्यालय भिसी
तृतीय क्रमांक 
ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर

प्रहसन
प्रथम क्रमांक ग्रामगीता महाविद्यालय, चिमुर

द्वितीय क्रमांक
कला, वाणिज्य महाविद्यालय भिसी

तृतीय क्रमांक
श्री. ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव

शास्त्रीय संगीत
प्रथम क्रमांक 
गायत्री थीपे
एफ.ई.एस. महिला महाविद्यालय चंद्रपूर

द्वितीय क्रमांक 
कु. अश्विनी ईश्वर नंदेश्वर
डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर
तृतीय क्रमांक
कु. साक्षी चुनारकर
श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव

सुगम संगीत

प्रथम क्रमांक
प्रज्वल मेश्राम
हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी

द्वितीय क्रमांक
कु.साक्षी कोसारे
ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर

तृतीय क्रमांक
कु. रामेश्वरी पठरे
सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय,पडोली चंद्रपूर

समुहगीत
प्रथम क्रमांक
सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर
द्वितीय क्रमांक 
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय नागभिड, जि. चंद्रपूर
तृतीय क्रमांक
ग्रामगीता महाविद्यालय, चिमुर

शास्त्रीय ताण वाद्य संगीत
प्रथम क्रमांक
साहिल सुत्रपवार
कर्मवीर महाविद्यालय, मुल

शास्त्रीय ताल वाद्य
प्रथम क्रमांक
अजीत कुकडकर
महात्मा गांधी महाविद्यालय चंद्रपूर
द्वितीय क्रमांक
शंतनु जंजाळकर
सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर

पाश्चिमात्य गायन
प्रथम क्रमांक
कु. गायत्री जाधव
सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर

द्वितीय क्रमांक
कुणाल कवाडे

तृतीय क्रमाक
निकेश सुखदेवे
ग्रामगीता महाविद्यालय चिमूर

वादविवाद स्पर्धा
प्रथम क्रमांक
१) कु.चांदणी एम. धनकर

२) प्रलय श्याम म्हशाखेत्री 

सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर

द्वीतिय क्रमांक
 कु. प्राची पी. चौधरी
कला, वाणिज्य महाविद्यालय भिसी
तृतीय क्रमांक
अरबाज शेख
पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

वक्तृत्व स्पर्धा

प्रथम क्रमांक
प्रलय श्याम म्हशाखेत्री
सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर

द्वितीय क्रमांक
अरबाज शेख
पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली 

तृतीय क्रमांक
श्रविल रविंद्र तुपकर
डॉ. खत्री महाविद्यालय, चंद्रपूर

रांगोळी स्पर्धा
प्रथम क्रमांक
अनुप अमर माझी
पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली 

द्वितीय क्रमांक
कु. प्रियंका प्रविन मंडल
डॉ. आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर

तृतीय क्रमांक
पुनम निकुरे
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय नागभिड

प्रश्नमंजुषा
प्रथम क्रमांक
पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

द्वितीय क्रमांक 
कर्मवीर महाविद्यालय मुल

तृतीय क्रमांक 
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली

स्थळ छायाचित्र
प्रणय वाढाये
सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर

द्वितीय क्रमांक
मिथुन येनूरवार
महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी

तृतीय क्रमांक
क्रांतीवीर सिडाम
जनता महाविद्यालय चंद्रपूर

स्थळचित्र
प्रथम क्रमांक
आरती अनिल आरके
ग्रामगीता महाविद्यालय चिमूर

द्वितीय क्रमांक 
यासमिन पठान
चिंतामणी विज्ञान महाविद्यालय पोंभुर्णा, जि.चंद्रपूर

पोस्टर मेकिंग
प्रथम क्रमांक
पल्लवी सरकार
चिंतामणी विज्ञान महाविद्यालय पोंभुर्णा, जि.चंद्रपूर

द्वितीय क्रमांक
वैष्णवी बाजीराव राजगडकर
सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय,
पडोली चंद्रपूर

तृतीय क्रमांक
आरती अनिल आरके
ग्रामगीता महाविद्यालय चिमूर
व्यंगचित्र
प्रथम क्रमांक
श्रद्धा दिलीप राजूरकर
चिंतामणी विज्ञान महाविद्यालय पोंभुर्णा, जि. चंद्रपूर

द्वितीय क्रमांक
वैभव व्ही. मेश्राम
चिंतामणी कला व विज्ञान महाविद्यालय पोंभुर्णा

तृतीय क्रमांक
संकेत पचारे
आदर्श महाविद्यालय देसाईगंज वडसा

मातीकला
प्रथम क्रमांक
जय पातळे चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा, जि.चंद्रपूर

द्वितीय क्रमांक
भावेश जाधव
सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर

तृतीय क्रमांक
तेजराव भांडेवार चिंतामणी विज्ञान महाविद्यालय पोंभुर्णा, जि.चंद्रपूर

चित्रकला
प्रथम क्रमांक
कु.समिक्षा साखरकर चिंतामणी विज्ञान महाविद्यालय, पोंभुर्णा

मुकनाटय
प्रथम क्रमांक
कला, वाणिज्य महाविद्यालय भिसी

द्वितीय क्रमांक
ग्रामगीता महाविद्यालय चिमुर

तृतीय क्रमांक
केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी

नकला
प्रथम क्रमांक
सचिन राऊत
नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी
द्वितीय क्रमांक
साक्षी मुकुंदा कौरासे ग्रामगीता महाविद्यालय, चिमुर

Share News

copylock

Post Top Advertisement

-->