'मुख्यमंत्री वयोश्री योजना' अंतर्गत जेष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये.! वाचा सविस्तर.. - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

'मुख्यमंत्री वयोश्री योजना' अंतर्गत जेष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये.! वाचा सविस्तर..

दि.02.03.2024 

MEDIA VNI 

'मुख्यमंत्री वयोश्री योजना' अंतर्गत जेष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये.! वाचा सविस्तर..

Mukhyamantri Vyoshree Yojana:

मीडिया वी.एन.आय : 

मुबंई : महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री वयोश्री योजना' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा लाभ 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना काही शारीरिक अपंगत्व किंवा मानसिक आजार  आहे तसेच ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल अशा नागरिकांची तपासणी केली जाईल आणि पात्र आढळलेल्यांना 3,000 रुपये दिले जातील.

ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये खर्चून राबविण्यात येणार आहे. सहकारी संस्थांवरील विश्वास वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने सहाय्य योजना जाहीर केली आहे. दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.  मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविली जाणार आहे. अगोदर ठराविक जिल्हांमध्ये ही योजना सुरु होती.

योजनेसंदर्भातील अधिक माहिती 

- राज्य सरकारच्या निर्णयानुसार ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात हि वयोश्री योजना राबविली जाणार आहे. 

- 65 वर्षावरील नागरिकांचे वार्षिक उत्पन्न  2 लाख रुपये अशा नागरिकांना वयोश्री योजनेचा लाभ घेता येणार आहे.

- आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे.

-ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण सुद्धा या योजनेतून देण्यात येणार आहे.

तुमच्या घरात कोणी जेष्ठ नागरिक असतील तर तुम्ही त्यांना या योजनेबद्दल सांगू शकता.  पात्र नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकता. योजने बद्दलची अधिक माहिती देण्यात आली आहे.


Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->