दि. 27 जुलै 2024
पोभुर्णा तालुक्यात वैनगंगा नदीच्या पुरामुळे शेत पिकांचे नुकसान.!
मीडिया वी.एन.आय :
प्रतिनिधी/चंद्रपूर : पोभुर्णा : पोभुर्णा तालुक्यातील जुनगाव वैनगंगा नदीला पुर परिस्थिती निर्माण झाल्याने, सगळीकडे पाणीच पाणी पसरले असून गावालगतच्या शेती शिवारात पाण्याचा शिरकाव होऊन शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस रोवलेल्या धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. वैनगंगा नदीला लागूनच शेती अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील दिवसांत शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज उसनेवार पैसे घेऊन बि बियाणे खतांची खरेदी करून पिकांची लागवड केली. परंतु गोसीखुर्द धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्याने पुराचे पाणी सर्वत्र शेत शिवारात पसरले गेले आहे. पुराच्या पाण्याचा फटका देवाडा बुज, जुनगाव, पिपरीदेशपांडे, गंगापूर टोक, ठानेवासना इत्यादी गावांना बसला असुन बहुतांशी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे तेव्हा शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून नुकसान भरपाई देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.Wainganga river floods in Pobhurna taluka causing damage to crops. #Chandrapur #MaharashtraNews