गावात दारूबंदीचा ठराव मंजूर करणाऱ्या हालूर ग्रामस्थांसह एलआयएफ चे कर्मचारी.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गावात दारूबंदीचा ठराव मंजूर करणाऱ्या हालूर ग्रामस्थांसह एलआयएफ चे कर्मचारी.!

दि. 21.09.2025
MEDIA VNI 
गावात दारूबंदीचा ठराव मंजूर करणाऱ्या हालूर ग्रामस्थांसह एलआयएफ चे कर्मचारी.! 
 - हालूर च्या महिलांनी पारित केला गावात दारूबंदीचा ऐतिहासिक ठराव.! 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पूरसलगोंदी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या हालूर गावातील ग्रामस्थांनी एकमुखाने गावात दारूबंदीचा ठराव मंजूर केला असून यामध्ये विशेषतः महिलांनी पुढाकार घेतला आहे. गावातील महिलांनी, व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशन (एलआयएफ) च्या प्रेरणेने आणि पाठिंब्याने, दारू सेवनामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक आव्हानांविरुद्ध ठाम भूमिका घेतली आहे.
गावातील महिलांनी कौटुंबिक वाद, आरोग्य समस्या, आर्थिक अस्थिरता, वाहन दुर्घटनेला कारणीभूत ठरणाऱ्या दारूच्या व्यसनाविरोधात भूमिका घेत हालूर गावातून या संकटाचे उच्चाटन करण्याचा एकत्रितपणे संकल्प केला. त्यांच्या सक्रिय भूमिकेला आणि दृढ निर्णयाला सर्व ग्रामस्थांकडून प्रचंड पाठिंबा मिळाला आहे.
या सकारात्मक पुढाकारामुळे गावातील समग्र विकासाला चालना मिळेल, आरोग्य सुधारेल, व सामाजिक सौहार्द वृद्धिंगत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दारूमुक्त गावाच्या दिशेने झालेला हा ऐतिहासिक निर्णय ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रगतीशील आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून या ठरावाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
यासाठी गावातील सरपंच श्रीमती अरुणाताई मधुकर सडमेक, गावातील पाटील श्री. लच्चू हेडाऊ, भूमिया श्री. धनसू होडे, महिला मंडळ अध्यक्षा कलावती तिरकी, उपाध्यक्षा फुलसिना एक्का, सचिव बाली हेडो, नवरी हेडो, बाली हेडो, शांती कुड्येती, तानी हेडो, जमाता हेडो, गीता हेडो, चमेली मिंज, विमला किंडो, कलावती तिरकी, फुलवती टोप्पो, तेरेसा टोप्पो, सविता टोप्पो, सविता बडा, किलसीता रिका, सावित्री आत्राम, बाली आत्राम, अनिता मिंज, इर्पे आत्राम, प्रतिमा तिग्गा, संजना हेडो, रजनी हेडो, कुम्में हेडो, शिवानी गेडाम, ग्राम संपर्क केंद्राचे कर्मचारी श्री. किशोर गावडे यांनी पुढाकार घेतला आहे.
हालूरच्या महिला आणि ग्रामस्थांच्या सामूहिक भावनेने आणि दृढनिश्चयाने चांगल्या आणि निरोगी समाजासाठी परिवर्तनकारी बदल कसा घडवून आणता येऊ शकतो याचे एक प्रेरणादायी उदाहरण प्रस्तुत केले आहे. व्यसनमुक्ती उपक्रमांबाबत एलआयएफ ग्रामस्थांना प्रेरित करीत राहील आणि पाठिंबा देत राहील.
LIF staff along with Halur villagers who passed a resolution to ban alcohol in the village.! 
- Women of Halur passed a historic resolution to ban alcohol in the village.
#MediaVNI #gadchiroli 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->