MEDIA VNI
गडचिरोली नगरपरिषदेत भाजपचा झेंडा; ॲड. प्रणोती निंबोरकर नगराध्यक्षपदी विजयी.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोली नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार ॲड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांनी ४,८३९ मतांच्या निर्णायक फरकाने एकतर्फी विजय मिळवला. कृषी महाविद्यालय येथे पार पडलेल्या मतमोजणीत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेत दणदणीत यश संपादन केले.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अश्विनी रवींद्र नैताम यांना ६,९२३ मते, तर काँग्रेसच्या कविता सुरेश पोरडीवार यांना ६,०९४ मते मिळाली.
२१ डिसेंबर रोजी आयटीआय चौक परिसरात कडेकोट बंदोबस्तात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. निकाल जाहीर होताच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला.
विजयी रॅलीचेही आयोजन करण्यात आले.
नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांची प्रतिक्रिया..
नवनियुक्त नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी जनतेचे आभार मानत सांगितले, “हा विजय माझा नसून प्रत्येक गडचिरोलीकराचा आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन शहराचा कायापालट करण्याचा माझा निर्धार आहे.”
नगरपरिषदेत पक्षनिहाय स्थिती
गडचिरोली नगर परिषदेतील २७ जागांपैकी
भाजप: १५ नगरसेवक
काँग्रेस: ६ नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): ५ नगरसेवक
वंचित बहुजन आघाडी: १ नगरसेवक
भाजपचे विजयी उमेदवार
प्रभाग क्र. २: हर्षल गेडाम, कोमल नैताम
प्रभाग क्र. ३: योगिता पिपरे, अनिल कुणघाडकर
प्रभाग क्र. ४: वर्षा शेडमाके
प्रभाग क्र. ५: सिमा कन्नमवार (कोसे)
प्रभाग क्र. ६: ज्ञानेश्वरी धंदरे
प्रभाग क्र. ८: शेखर आखाडे, शिल्पा हेमके
प्रभाग क्र. ९: मुकतेश्वर काटवे, सौ. मारभते
प्रभाग क्र. १०: श्रीमती निंबोड, मडावी
प्रभाग क्र. १२: निखिल चरडे, साक्षी बोलूवार
काँग्रेसचे विजयी उमेदवार
प्रभाग क्र. १: पराग पोरडीवार, मनीषा खेवले
प्रभाग क्र. ४: श्रीकांत देशमुख
प्रभाग क्र. ५: सतीश विधाते
प्रभाग क्र. ६: रमेश चौधरी
प्रभाग क्र. ७: मेघा वरगंटीवार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – विजयी उमेदवार
प्रभाग क्र. ७: रवि मेश्राम
प्रभाग क्र. ११: लीलाधर भरडकर, प्रतिभा कुमरे
प्रभाग क्र. १३: माधुरी मंगरे, अंजुम माजिद सय्यद
वंचित बहुजन आघाडी/ परिवर्तन पॅनल
बाळू टेंभुर्णे – विजयी
या निकालाने गडचिरोलीच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व स्पष्ट झाले असून, आगामी काळात शहराच्या विकासदिशेला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


