- "पुस्तक हे ज्ञानाचे अमूल्य साधन; ज्ञानाच्या बळावरच उज्ज्वल भविष्य घडते" – खासदार डॉ. नामदेव किरसान
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध सामाजिक उपक्रमांना नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यानिमित्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ५,००० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण करण्यात आले. याशिवाय आयोजित स्वेच्छा रक्तदान शिबिरात २५ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खासदार डॉ. नामदेव किरसान म्हणाले, "पुस्तक हे ज्ञानाचे अमूल्य साधन आहे. आजचे वाचन आणि अभ्यासच उद्याच्या यशाचा पाया ठरतो. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. युवकांनी वेळेचा सदुपयोग करून स्वतःला सक्षम बनवावे."
या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत खासदार डॉ. किरसान यांचे आभार मानले.
यावेळी आमदार अभिजीत वंजारी, आमदार रामदास मसराम, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, ॲड. दुष्यंत नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलम, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, जीवन पा. नाट, शंकरराव सालोडकर, प्रभाकर वासेकर, समशेर खान पठाण, माधव गावड, अजय लोंढे, परसराम टिकले, नगरसेवक रमेश चौधरी, पराग पोरेड्डीवार, श्रीकांत देशमुख, नगरसेविका मेघा वरगंटीवार, नगरसेविका मनीषा खेवले, नगरसेवक नंदू कायरकर, सुनील चटगुलवार, मिलिंद खोब्रागडे, राजेंद्र बुल्ले, प्रशांत कोराम, मनोज अग्रवाल, प्रमोद भगत, अनिल कोठारे, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, हरबाजी मोरे, नीतीन राऊत, दिलीप घोडाम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी परिश्रम, शिस्त, सकारात्मक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांचे महत्त्व अधोरेखित केले. सामाजिक उपक्रमातून शिक्षणाला चालना देत युवकांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.