विविध सामाजिक उपक्रमांतून खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

विविध सामाजिक उपक्रमांतून खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा!

दि. 14 जुलै 2026 
MEDIA VNI 
विविध सामाजिक उपक्रमांतून खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा!
मीडिया वी.एन.आय :  
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण लोकसभा क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी लोकसभा क्षेत्रातील एक लाखांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा महिला रुग्णालय, गडचिरोलीसह विविध तालुकास्तरीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले. जिल्हा महिला रुग्णालयात भोजनदानाचा उपक्रम राबवून समाजसेवेचा संदेश देण्यात आला.
गडचिरोली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पीएम श्री जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा, रामनगर, नगरपरिषद शाळा, रामपुरी, सावित्रीबाई फुले शाळा, गोकुळनगर तसेच भगवंतराव प्राथमिक व कनिष्ठ विद्यालय, गोकुळनगर येथे विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण करण्यात आले. याशिवाय संपूर्ण गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण, रक्तदान, रुग्णसेवा, शैक्षणिक साहित्य वितरण, भोजनदान आदी सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडले.
यावेळी गडचिरोली येथील कार्यक्रमात महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, नगरसेवक तथा शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष समशेरखान पठाण, जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेविका मेघा वरगंटीवार, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष माधव गावड, सहकार सेल जिल्हाध्यक्ष अब्दुलभाई पंजवाणी, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, दिवाकर निसार, माजी नगरसेवक संजय मेश्राम, ढिवरू मेश्राम, नदीम नाथानी, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, मोहन वरगंटीवार, जितेंद्र मुनघाटे, उत्तम ठाकरे, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलट्टीवार, दिपक पिलारे, अजय भानारकर, किशोर धाकळे, सचिन चापले, विजय राऊत, स्वप्निल बेहरे, दिनेश सिडाम, जावेद खान, कविता उराडे, रीता गोवर्धन, शालिनी पेंदाम, पुष्पाताई कुमरे, संध्याताई उईके, मीनलताई चिमुरकर, शीतलताई ठवरे, अर्चनाताई मडावी, विमलताई भोयर यांच्यासह काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय तसेच विविध विभाग व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या जनसेवा, सामाजिक बांधिलकी आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव केला. शिक्षण, आरोग्य, आदिवासी विकास, शेतकरी कल्याण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने केलेल्या कार्याची प्रशंसा करत, समाजहिताचे उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
MP Dr. Namdev Kirsan's birthday celebrated with great enthusiasm through various social initiatives!

Share News

copylock

Post Top Advertisement

(MEDIA VNI)

Chief Editor, Founder & Director

"Mr. Rajesh Khobragade"

Educational Qualifications :- BA, MA, B.ED, MAJMC, MBA...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->